
कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचे अभयारण्य क्षेत्रात काम करण्यास परवानगी मिळण्याबाबतच्या प्रस्तावास लवलकरात लवकर मान्यता मिळवून द्यावी अशा मागणीचे निवेदन कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर सौ.अश्वीनी रामाणे व आयुक्त पी.शिवशंकर यांनी आज केंद्रीय पर्यावरण, वन राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांना दिले. शिवाजी विद्यापीठाच्या विश्रामगृहात महापौर रामाणे, आयुक्त पी.शिवशंकर यांनी त्यांची भेट घेवून हे निवेदन सादर केले.
यावेळी पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी यापुर्वीच 4 नोव्हेंबरच्या दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मिळालेली परवानगी हीच अंतिम परवानगी असे सांगितले. त्यामुळे अन्य कोणत्याही समितीच्या परवानगीची आवश्यकता नाही असे सांगितले. याबाबत त्यांनी दिल्ली येथील संबधीत अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरुन याबाबतचे आदेश काढण्याबाबत सुचना दिल्या.
कोल्हापूर शहरास पंचगंगा नदीच्या दुषीत पाण्याचा प्रश्न भेडसावत असलेने केंद्र शासनाच्या युआयडीएसएसएमटी योजनेअंतर्गत कोल्हापूर शहरास काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनने पाणी पुरवठा करण्याची 425.41 कोटी खर्चाची योजना केंद्र सरकारने मंजूर केली आहे. सदर योजनेचे जॅकवेल व इतर कामे राधानगरी अभयारण्याच्या क्षेत्रात करावी लागणार आहेत. अभयारण्य क्षेत्रात काम करण्यास परवानगी मिळण्याबाबतच्या प्रस्तावास राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीच्या दि.4/11/2015 च्या 36 व्या बैठकीमध्ये शिफारस करण्यात आलेली आहे. सद्या या प्रस्तावास केंद्र शासनाच्या सेन्ट्रल एम्पॉवर कमिटी (CEC) मान्यतेसाठी प्रलंबित आहे. तरी कृपया आपल्या स्तरावर प्रयत्न करुन CEC कडून प्रस्तावास मान्यता मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे असे रामाणे यांनी निवेदनात म्हटले आहे,
यावेळी आमदार सतेज पाटील यांनी मंत्री जावडेकर यांचेशी चर्चा केली.
Leave a Reply