
कोल्हापूर : ‘आविष्कार’ या राज्यस्तरीय संशोधनपर स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाला एक-दोन नव्हे, तर एकूण चार पारितोषिके मिळवून देणाऱ्या शिक्षक-विद्यार्थ्यांचे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी अभिनंदन केले.
पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात यंदाच्या राज्यस्तरीय ‘आविष्कार’ संशोधन स्पर्धा पार पडल्या. शिवाजी विद्यापीठातर्फे स्पर्धेत ४३ विद्यार्थी व स्पर्धक सहभागी झाले. त्यापैकी दहा जणांची अंतिम फेरीत निवड झाली. त्यातील चौघांनी विविध पारितोषिके पटकावली. विद्यापीठाच्या एमबीए अधिविभागातील सहाय्यक प्राध्यापक गंधाली विजय खारगे यांनी कॉमर्स ॲन्ड मॅनेजमेंट विभागात शिक्षक गटामध्ये द्वितिय पारितोषिक पटकावले, तर याच विभागात संशोधक विद्यार्थी गटात मोहम्मदरियाझ फणीबंध यांनीही द्वितिय पारितोषिक मिळविले. कोल्हापूर येथील भारती विद्यापीठ फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थिनी आफरिन अत्तार यांनी शास्त्र गटात प्रथम, तर वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे फार्मसी कॉलेजच्या अभिनंदन पाटील यांनी औषध निर्माण शास्त्र गटात प्रथम पारितोषिक मिळविले.
संघ प्रमुख डॉ. ए.एम. गुरव आणि डॉ. श्रीमती एस.ए. साबळे यांनी विजेत्या विद्यार्थ्यांसह कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची भेट घेतली. यावेळी बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, प्रा. पी.ए. अत्तार उपस्थित होते
Leave a Reply