स्विकृत नगरसेवक पदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल

 

20151214_213947-BlendCollageकोल्हापूर:- कोल्हापूर महानगरपालिका स्विकृत नगरसेवक पदाकरिता आज आयुक्त पी.शिवशंकर यांचेकडे महापालिकेच्या आघाडी/पक्षाच्या गटनेत्यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. एकूण पाच जागांकरिता नामनिर्देशपत्रे दाखल करण्यात आली.

यामध्ये कॉग्रेस विकास आघाडीतर्फे गटनेते शारंगधर देशमुख यांनी तौफिकअहमद अकबर मुल्लाणी व मोहन रामचंद सालपे, ताराराणी आघाडी पक्षातर्फेे गटनेते सत्यजित कदम यांनी सुनिल महादेव कदम, नॅशनॅलीस्ट कॉग्रेस पार्टीतर्फे गटनेते सुनील पाटील यांनी जयंत गोविंदराव पाटील तर भारतीय जनता पक्ष व मित्र आघाडीतर्फे गटनेते विजय सुर्यवंशी यांनी किरण शांताराम नकाते यांचे नामनिर्देशनपत्र दाखल केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!