अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपचा अपोलो प्रोहेल्थ; पहिला सर्वसमावेशक आरोग्य व्यवस्थापन कार्यक्रम

 

कोल्हापूर:अपोलो हॉस्पिटल्स ग्रुप या भारतातील पहिल्या मल्टि-स्पेशालिटी हॉस्पिटल्स च्या साखळीने आज अपोलो प्रोहेल्थ प्रोग्रॅम हा अत्यंत प्रभावी, सक्रिय आरोग्य व्यवस्थापन कार्यक्रम दाखल केला आहे. अपोलो प्रोहेल्थ हा पीएचआरएचे (पर्सनलाइज्ड हेल्थ रिस्क असेसमेंट) पाठबळ असणारा, आर्टिफिशिअल इंटलिजन्सवर आधारित पहिलावहिला कार्यक्रम असणार आहे. अपोलोने केलेल्या 20 दशलक्षांहून अधिक आरोग्य तपासण्यांच्या आधारे, अपोलोमधील प्रिव्हेंटिव्ह हेल्थकेअर क्षेत्रातील तज्ज्ञांनी व संशोधकांनी प्रामुख्याने हा कार्यक्रम तयार केला आहे. आरोग्याला असणारे धोके ओळखण्यासाठी व कमी करण्यासाठी आणि निरोगी व आनंदी आरोग्य जगण्यासाठी प्रोहेल्थ कार्यक्रम व्यक्तींना व व्यवसायांना कृतीयोग्य हेल्थ अॅनालिटिक्सने सक्षम करतो. प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक व्यक्तीला आपल्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यास मार्गदर्शन करण्यासाठी आणि उत्तम आरोग्य व आनंद मिळवण्यासाठी वैयक्तिक आरोग्य मार्गदर्शक उपलब्ध करून, हा कार्यक्रम तंत्रज्ञान व मानवी घटक यांना एकत्र आणतो.यावेळी बोलताना अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपचे अध्यक्ष डॉ. प्रतास सी.रेड्डी यांनी सांगितले, आपण सर्व जण आजार झाल्यावर ते बरे करण्यावर भर देतो,आजार होऊ नयेत म्हणून काळजी घेण्यावर भर देत नाही. लोकांनी आरोग्यसेवेतील केअरवर भर द्यावा,असे मला वाटते.आजारांवर उपचार करणे, हा आरोग्याकडे जाणारा एकमेव मार्ग नाही. आपण आरोग्याची काळजी घेतली तर आपल्याला आजार बरे करण्याची गरज पडणार नाही. जगासमोर एनसीडींची (नॉन-कम्युनिकेबल डिसिजेस) लाट आली आहे.या लाटेचा धोका तरुण पिढीलाही निर्माण झाला आहे.महत्त्वाकांक्षी व आक्रमक असणाऱ्या आपल्यासारख्या अर्थव्यवस्थेत आपली क्षमता खऱ्या अर्थाने ओळखण्यासाठी निरोगी नागरिकांची गरज आहे. लाइफस्टाइल डिसिजेस किंवा एनसीडी यांचे प्रमाण वाढत असल्यास हे कधीही साध्य करता येणार नाही.कॅन्सर, डायबिटीस, स्ट्रोक, ओबिसिटी, धूम्रपान यांचा आपल्या क्षमतेवर परिणाम होत जातो. त्यामुळे आपली उत्पादकता व आर्थिक प्रगती यावरही परिणाम होतो. आपल्या आरोग्याला आपण कसे हाताळतो, यामध्ये बदल करण्याच्या दृष्टीने टाकलेले अपोलो प्रोहेल्थ हे एक पाऊल आहे.”अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपने चार दशकांपूर्वी देशात पहिले ‘पर्सनलाइद्ड प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेक’ दाखल केले आणि आता आरोग्यसेवेला नवे आयाम देण्यासाठी आम्ही जगातील सर्वात प्रभावी प्रिव्हेंटिव्ह हेल्थ मॅनेजमेंट प्रोग्रॅम दाखल करत आहोत.एनसीडींमुळे होणारे अंदाजे 80% मृत्यू रोखता येऊ शकतात आणि अपोलो प्रोहेल्थ कार्यक्रम हे मृत्यू थोपवण्यासाठी मदत करू शकतो,”असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!