अँमेझॉनने महाराष्ट्रात लाँच केले सर्वात मोठे फुलफिलमेंट सेंटर

 

मुंबई : महाराष्ट्रात इंफ्रास्ट्रक्चर चा विस्तार करत अँमेझॉन डॉट इन द्वारे राज्यात सर्वात मोठे फुलफीलमेंट सेंटर (एफसी) सुरु करण्याची घोषणा करण्यात आली.त्यामुळे आता सणासुदीच्या सुरुवातीस अ‍ॅमेझॉन डॉट इनला ग्राहकांचा अनुभव वाढविण्यास मदत मिळेल.भिवंडीजवळ स्थित या नवीन फुलफीलमेंट सेंटरचा १.५ दशलक्ष घनफुट पेक्षा जास्त स्टोरेज स्पेस असून यामुळे आता प्रदेश तसेच शेजारी राज्यातील ग्राहकांचे ऑर्डर लवकरात लवकर पोहचविण्यास मदत मिळेल. या इंफ्रास्ट्रक्चरसोबत महाराष्ट्रातील इतर फुलफीलमेंट सेंटर मिळून अ‍ॅमेझॉन डॉट इनची स्टोरेज कॅपॅसिटी ६ दशलक्ष घनफूट इतकी आहे.२०१९ मध्ये संपूर्ण देशातील १३ राज्यातील ५० पेक्षा अधिक फुलफीलमेंट सेंटर मिळून अँमेझॉन इंडियाकडे एकूण स्टोरेज स्पेस जवळपास २५ दशलक्ष घनफूट इतकी असेल.लाँच बद्दल बोलतांना अखिल सक्सेना,उपाध्यक्ष, इंडीया कस्टमर फुलफीलमेंट, अँमेझॉन इंडीया म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्वात मोठे फुलफीलमेंट सेंटर सुरु करण्यासाठी आम्ही अत्यंत उत्साही आहोत.या नवीन इंफ्रास्ट्रक्चरमुळे आम्ही आमच्या ग्राहकांची अधिक चांगल्या प्रकारे सेवा करण्यास सक्षम होऊ तसेच राज्यातील छोट्या आणि मध्यम व्यवसायाच्या ग्राहकांचे ऑर्डर पूर्ण करण्यास देखील मदत मिळेल. राज्यातील आमच्या गुंतवणुकीमुळे रोजगाराच्या हजारो संधी देखील उपलब्ध होतील. पुढच्या वर्षी या फुलफीलमेंट सेंटरच्या माध्यमातुन जवळपास २००० प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष इतक्या नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.या असोसिएटमुळे आम्हाला आमच्या ग्राहकांची सेवा करण्यास मदत मिळेल तसेच सातत्याने उत्तम ग्राहक अनुभव वितरित करण्यास सक्षम होऊ.अँमेझॉन हे जगातील सर्वात प्रगत पूर्ततेचे नेटवर्क आहे तसेच अँमेझॉनच्या परिपूर्ती मध्ये कौशल्य, विश्वसनीय देशव्यापी वितरण आणि ग्राहक सेवेचा फायदा भारतीय विक्रेत्यांना होतो.फुलफीलमेंट बाय अँमेझॉन(एफबीए) चा वापर करतांना भारतीय विक्रेते त्यांचे उत्पादने अँमेझॉनच्या फुलफीलमेंट सेंटर (एफसी) मध्ये पाठवतात, आणि आणि एकदा ऑर्डर प्लेस झाला की,अँमेझॉन ऑर्डर ग्राहकांकडे पिक,पॅक आणि शिप करतो,तसेच ग्राहक सेवा समर्थन प्रदान करतो व विक्रेत्यांच्या वतीने रिटर्न्स देखील सांभाळतो. महाराष्ट्रातील फुलफीलमेंट सेंटर ग्राहकांच्या स्मार्टफोन, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, अप्लायन्सेस, फॅशन आणि कंझ्युमेबल्स (एफएमसीजी) यांसारख्या श्रेणींमधील उत्पादनांची पूर्तता करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!