
कोल्हापूर : धर्माच्या नावाने चुकीचा प्रचार करतात त्याच धर्मातील घटकांना शांतता आणि विकास हवा आहे. प्रसार मध्यमानी याचे वास्तव चित्र दिले पाहिजे.समाजातील घटकांमध्ये अंतर वाढेल यासाठी लेखणी वापरु नये तर लोकांच्यामध्ये सुसंवाद वाढण्यासाठी, अर्थववस्थेत सुधारणा पर्यायाने देशाची परिस्थिति सुधारण्यासाठी लेखणीचा वापर केला पाहिजे.यासाठी प्रसार माध्यमानी स्वच्छ भूमिका मांडावी असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्र वादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. सदयाची राजकीय परिस्थिति आणि प्रसार माध्यमांची भूमिका या विषयावर कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.देशात जरी स्थिर सरकार असले तरी शेजारील देशांच्या सबंधाबाबत चिंताजनक परिस्थिति आहे. शेतीमधे अस्वस्थता आहे. लोकांची क्रयशक्ति दुर्बल बनली आहे. विकासाचा दर वाढलेला नाही. चलन नसल्याने अर्थव्यवस्था दुर्बल बनत आहे.याचा परिणाम उद्योग व्यापारावर होत आहे. ज्यांच्या हातात लोकानी सत्ता दिली त्यांच्या बद्दल नाराजी लोकांमधे पसरत असल्याने एकूणच मोदी सरकारचा आलेख खाली घसरताना दिसत आहे. यासाठी सर्व क्षेत्रात वेळीच गुंतवणूक वाढवली तरच अर्थव्यवस्था मजबूत बनेल. विरोधकांबाबत ते बोलताना ते म्हणाले देशाच्या हितासाठी असणाऱ्या गोष्टीना विरोध केला जातो म्हणून विरोधकांनी टोकाची न्हवे तर सामंजस्यची भूमिका घेणे गरजेचे आहे.
मोदींची पाकिस्तानला अचानक दिलेली भेट ही शेजारील देशांमधील कटुता संपवण्याचा संदेश संपूर्ण जगात नक्कीच जाईल.
देशाची परिस्थिति सुधारण्यासाठी माध्यमा ची भूमिका महत्वाची आहे असे ते आवर्जून म्हणाले. यावेळी अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती महाराज होते
महापौर सौ. अश्विनी रामाणे यांच्या हस्ते प्रेस क्लबला जागेच्या हस्तांतरणाचे पत्र देण्यात आले यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, माजी खासदार निवेदिता माने, उपमहापौर शमा मुल्ला यांच्या सह मान्यवर, संपादक, पत्रकार आणि कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.प्रस्ताविक अध्यक्ष विकास कांबळे यांनी केले तर आभार उपाध्यक्ष सतीश घाटगे यांनी केले.
Leave a Reply