
कोल्हापूर: पालकमंत्री वैद्यकीय सहायत्ता कक्षाच्यामार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील गरजू रुग्णासाठी विविध योजनेंच्या माध्यमातून उपचार केले जातात. आज कोल्हापूर जिल्ह्यातील आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत निवड झालेल्या १००० लाभार्थ्यांना या गोल्डन कार्डचे वितरण भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, प.म.देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, पालकमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी बाळासाहेब यादव, भाजपा सरचिटणीस विजय जाधव,अशोक देसाई, दिलीप मेत्राणी यांच्या प्रमुख उपस्थितीत केशवराव भोसले नाट्यगृह येथे करण्यात आले. यावेळी विशेष कार्यकारी अधिकारी विकास देशमुख, आर.डी.पाटील, अॅड.संपतराव पवार, चंद्रकांत घाटगे, गणेश देसाई, नचिकेत भुर्के यांची उपस्थिती होती. लाभार्थ्यांना रुग्णालयात प्राप्त होत असलेल्या लाभामध्ये रुग्णालयातील खाटा, सुश्रुषा व भोजन, एकवेळचा परतीचा प्रवास भत्ता, आवश्यक औषधोपचार व साधन सामुग्री, निदानसेवा, भूलसेवा व शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे. पालकमंत्री वैद्यकीय सहाय्यता
Leave a Reply