
कोल्हापूर: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल पन्हाळा तालुक्यात सापळा लावला होता. या सापळ्यामधील सीसीटीव्ही फुटेज, संबंधिताच्या आवाजाचे नमुने, सीडीआर पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. याबाबत तज्ञांचे अभिप्राय आल्यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल होईल, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.या पत्रकार परिषदेत पोलीस उप अधीक्षक श्री. बुधवंत यांनी माहिती दिली. ते म्हणाले, लोकसेवकाने 2 हजार रूपये मागितल्याची तक्रार काल आली होती. या तक्रारीची दखल घेत पथकाने पडताळणी केली. तडजोडीअंती 1 हजार रूपये देण्याचे ठरविले. तक्रारदाराकडून पैसे स्वीकारताना लोकसेवकाने कशाला काय अशा स्वरूपाची बातचीत झाली. या प्रकरणात लोकसेवकाला ताब्यात घेऊन तपास सुरू केला. या तपासात काही गोष्टिंमध्ये तफावत जाणवली. काही मध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे मिळालेले सीसीटिव्ही फुटेज,सीडीआर,संबंधित संभाषणाच्या आवाजाचे नमुने पुणे येथील तज्ञांकडे पाठविले आहेत. 10 ते 15 दिवसांत तज्ञांकडून आलेल्या अभिप्रायानंतर या प्रकरणातील आरोपीवर गुन्हा दाखल होऊन पुढील कारवाई करण्यात येईल.
Leave a Reply