
प्रेम ही अडीच अक्षरं नुसती कानावर जरी पडली तरी अनेकांच्या अंतकरणातील तारा छेडल्या जातात. प्रत्येकाच्या मनात ‘त्या’ खास व्यक्तीबद्दलचा हळवा कोपरा हा असतोच. प्रेमात पडणं जरी सोपं असलं तरी ते निभावणं मात्र कठीण. प्रेमासाठी कायपण करण्याची तयारी असणारे प्रेमवीर अगदी हाताच्या बोटावर मोजावे इतकेच. युवराज त्यापैकीच एक. श्रुतीवर जीवापाड प्रेम करणारा आणि प्रेमासाठी कायपण करायला तयार असणारा. श्रुती आणि युवराजची ही अनोखी लव्हस्टोरी स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या ‘साता जल्माच्या गाठी’ या मालिकेतून पाहायला मिळेल. प्रेमाच्या आणाभाका देत सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या या दोघांच्याही प्रेमाची गोष्ट वाटते तितकी सोपी नाही बरं का. यांनाही बरीच अग्निदिव्य पार करावी लागणार आहेत. म्हणूनच युवराज श्रुतीची ही प्रेमकहाणी थोडी हटके आहे. सध्या या मालिकेच्या प्रोमोजनी सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे.
Leave a Reply