
कोल्हापूर: कोल्हापूर मध्ये आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर बद्दल महापुराचा चुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर अजूनही फिरत आहे. महापूर येऊन महिना उलटून गेला तरीदेखील या चुकीच्या व्हिडिओमुळे बाहेरील भाविक व पर्यटकांमध्ये कोल्हापुर बद्दल संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या व्हिडिओमध्ये भवानी मंडप येथे असणाऱ्या प्राचीन कमानी सारख्या एका दरवाजातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा ओघ येऊन ते पाणी संपूर्ण शहरात जात आहे असे दिसत आहे. परंतु हा व्हिडीओ कोल्हापुरातील नसून अन्यत्र ठिकाणचा आहे. कोल्हापूर आता पुन्हा सूरळीतपणे सुरू आहे. तरी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविक कोल्हापूरला अंबाबाई चे दर्शन घेण्यासाठी येतात. तर त्यांनी घाबरून न जाता कोणत्याही सोशल मीडियाच्या चुकीच्या गोष्टींवर विश्वास न ठेवता कोल्हापुरात यावे असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Leave a Reply