
कोल्हापूर: निवडणूक कोणतीही असो महाडिक आणि पाटील हा वाद कोल्हापूरकरांना काही नवीन नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाडिक यांना पाडण्याची जवळजवळ संपूर्ण जबाबदारी सतेज उर्फ बंटी यांनी उचलून त्यांच्या विरोधात खासदार पदासाठी उभारलेले संजय मंडलिक यांना प्रचंड मताधिक्क्याने निवडून देण्यात बंटी पाटील यांचा मोठा सहभाग आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आताही कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणुकीसाठी ऋतुराज पाटील यांची उमेदवारी बंटी पाटील यांनी जाहीर करून अमल महाडिक यांना मोठे आव्हान दिले आहे. मधल्या काळात धनंजय महाडिक यांनीही भाजप मध्ये प्रवेश केला. नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेमध्ये अगदी मुख्यमंत्र्यांच्या शेजारीच धनंजय महाडिक उभे होते. आणि या बाजूला बंटी पाटील हे कॉल कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाल्याने पुन्हा पडझड झालेल्या काँग्रेसला उभारण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना एकत्रित करण्याचा सपाटा सुरु केला आहे. म्हणजे पक्ष कोणताही असो किंवा निवडणूक कोणतीही असो महाडिक आणि पाटील हे आमने-सामने असणार हे आता स्पष्ट आहे. यामुळे येत्या निवडणुकीत राजकीय ईर्षा टोकाला जाऊन कोल्हापुरची निवडणूक ही वेगळी ठरणार आहे आणि एक वेगळाच राजकीय रंग या निवडणुकीला चढलेला कोल्हापूरकरांना आणि महाराष्ट्राला बघायला मिळणार आहे.
Leave a Reply