
कोल्हापूर: जागतिक स्तरावर उत्कृष्टतेचा मापदंड निश्चित करणाऱ्या ‘इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन’ (आय.एस.ओ.) या संस्थेकडून येथील शिवाजी विद्यापीठाला सर्वंकष शैक्षणिक गुणवत्तेसाठी ‘आयएसओ- ९००१:२०१५’ मानांकनाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र प्राप्त करणारे शिवाजी विद्यापीठ हे देशातील चौथे आणि राज्यातील पहिले अकृषी राज्य विद्यापीठ ठरले आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. ‘आयएसओ’ प्रमाणपत्रामुळे शिवाजी विद्यापीठाने चालविलेल्या गुणवत्तापूर्ण वाटचालीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
Leave a Reply