आम आदमीची पहिली यादी जाहीर; करवीरमधून डॉ.आंनद गुरव यांना उमेदवारी

 

कोल्हापूर:महाराष्ट्र विधानसभा निवडणूकी साठी आज आम आदमी पक्षाच्या वतीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. राज्यभरातून अनेक इच्छुकांचे अर्ज मोठ्या संख्येने राज्य पक्ष कार्यालयाकडे जमा झाले होते. त्यानंतर छाननी प्रक्रिया आणि पक्षाची केंद्रीय स्तरावरील पॉलिटिकल अफेअर्स कमिटी यांच्याशी कमिटी यांच्याशी सल्लामसलत करून राज्य प्रचार समितीने उमेदवारांची यादी बनवली आहे.आम आदमी पक्ष हा देशातील सर्वाधिक वेगाने वाढणारा राजकीय पक्ष असून अल्पावधीतच दिल्लीमध्ये या पक्षाने आपले सरकार स्थापन केले, पंजाब मध्ये प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काम करत आहे आणि गोवा राज्यामध्ये लक्षणीय वोट शेअर शेअर कमावला आहे. दिल्लीमध्ये लोकांना सार्वजनिक सेवा उपलब्ध करून देण्याचे अनेक उच्चस्तरीय आदर्श आम आदमी पक्षाने प्रस्थापित केले आहेत आणि त्यामुळेच अल्पावधीत ‘गव्हर्नन्स’बाबत स्वतःचा अनोखा ब्रँड तयार करण्यामध्ये आम आदमी पक्षाला यश आले आहे.
भाजप-शिवसेना सरकारला गेल्या पाच वर्षांमध्ये जनताभिमुख कारभार करण्यामध्ये आलेले अपयश आणि या अपयशाबद्दल सरकारला धारेवर धरून जनतेचे खरे मुद्दे मांडण्यात कमी पडलेले विधान भवनातील विरोधी पक्ष यामुळे जनतेला त्यांचा खरा आवाज राज्याच्या राजकारणामध्ये मिळवून देण्यासाठी आम आदमी पक्ष ही विधानसभा निवडणूक लढवत आहे
येत्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे:
पारोमिता गोस्वामी (ब्रम्हपुरी विधानसभा,चंद्रपूर)
विठ्ठल गोविंद लाड (जोगेश्वरी पूर्व विधानसभा, मुंबई)
डॉ.आनंद गुरव (करवीर विधानसभा, कोल्हापूर)
विशाल वडघुले (नांदगाव विधानसभा, नाशिक जिल्हा)
डॉ.अभिजित मोरे (कोथरूड विधानसभा, पुणे जिल्हा)
सिराज खान (चांदीविली विधानसभा, मुंबई)
दिलीप तावडे (दिंडोशी विधानसभा, मुंबई उपनगर)
संदीप सोनावणे (पर्वती विधानसभा, पुणे जिल्हा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!