
कोल्हापूर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणाबाबतच्या विचारातून प्रेरणा घेवून महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना अध्यक्ष मा. आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून नव महाराष्ट्र घडविण्यासाठी महिला सहभागासाठी “प्रथम ती” अभियानातून जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने शिवसेनेच्या वतीने उद्या मंगळवारी सायंकाळी ६ वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे प्रथम ती” महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.यामध्ये मुंबई महानगरपालिका नगरसेविका सौ. किशोरी पेडणेकर, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास प्रभादेवीच्या सदस्या सौ.वैभवी चव्हाण, सौ. शीतल मांडे या मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी देवस्थान व्यवस्थापन समितीच्या कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर, शिवसेना नगरसेविका सौ. प्रतिज्ञा उत्तुरे, नगरसेविका सौ. तेजस्विनी इंगवले, शिवसेना महिला आघाडी शहरप्रमुख सौ.मंगलताई साळोखे, संजय गांधी योजनेच्या सदस्य सौ.पूजा भोर, माजी नगरसेविका स्मिता माळी आदी शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
Leave a Reply