अवैध दारू,शस्त्रे, पैसा आणि बोगस मतदार याबाबत दक्ष राहून कारवाई करावी  

 

कोल्हापूर :शांततापूर्ण, पारदर्शी आणि निर्भय वातावरणात विधानसभा निवडणूक पार पडण्यासाठी सीमा भागातील अधिकाऱ्यांनी आपापसात समन्वय ठेवावा. विशेषत: सीमा भागातून अवैध दारू,शस्त्रे,पैसा आणि मतदाना दिवशी बोगस मतदार येण्याची शक्यता लक्षात घेवून सुरूवातीपासूनच दक्ष राहून कारवाई करावी, असे निर्देश पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी आज दिले.पोलीस अधीक्षक कार्यालयातील परिषद सभागृहात कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्या अध्यक्षतेखाली आणि बेळगावचे पोलीस महानिरीक्षक राघवेंद्र सुहास यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र,गोवा,कर्नाटक सीमा भागातील पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांची सीमा परिषद झाली. या परिषदेला जिल्हाधिकारी दौलत देसाई, सांगली जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, सोलापूर पोलीस अधीक्षक मनोज पाटील,विजापूरचे पोलीस अधीक्षक प्रकाश निकम, दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक उत्कृष्ट प्रसून,सांगली पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा,सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, बेळगाव पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी, चिक्कोडीचे सहाय्यक पोलीस अधीक्षक मिथुन कुमार आणि निवासी उप जिल्हाधिकारी भाऊ गलांडे उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेलगत बेळगाव गोवा सिंधुदुर्ग-कर्नाटक या राज्यांच्या आणि जिल्ह्यांच्या सीमा असून या ठिकाणी 14 तपासणी नाके निर्माण करण्यात आले आहेत. तिलारी,फोंडा घाट तसेच कर्नाटक आणि गोवा या मार्गे प्रामुख्याने गुटखा, दारू आणि अवैध शस्त्रे येण्याची शक्यता गृहीत धरून तयारी पूर्ण करण्यात आल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!