
एकांकिका स्पर्धांच्या परंपरागत साचेबद्धपणापेक्षा वेगळेपण असलेल्या आणि नाट्य, चित्र, शिल्प, संगीत, नृत्य या कलांचा संगम साधून मराठी भाषेच्या दैदिप्यमान परंपरेला आजच्या युवापिढीच्या माध्यमातून उजाळा देण्याचा यशस्वी प्रयत्न करणारी राज्य मराठी विकास संस्थेची राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन नाट्याविष्कार स्पर्धा ‘रंगवैखरी’चे तिसरे पर्व जाहीर झाले आहे.
रंगवैखरीच्या तिसऱ्या पर्वासाठी ” कथारंग ” हा विषय देण्यात आला आहे. या पर्वात संस्थेने निवडलेल्या चिं. वि. जोशी,दिवाकर कृष्ण,बी. रघुनाथ,दि. बा. मोकाशी,जी. ए. कुलकर्णी, गंगाधर गाडगीळ,शंकरराव खरात,नारायण धारप,उद्धव शेळके,शंकर पाटील,द. मा. मिरासदार,रा. रं. बोराडे,बाबुराव बागूल,रणजीत देसाई,मधु मंगेश कर्णिक,वामन होवाळ,भारत सासणे,राजन खान,सतिश तांबे. या कथाकारांच्या तर कथालेखिका विजया राजाध्यक्ष,गौरी देशपांडे,सानिया,आशा बगे,प्रतिमा इंगोले, उर्मिला पवार या पंचवीसपैकी एका साहित्यिकाच्या कथेवर वा कथासाहित्यावर आधारित नवीन नाट्यसंहिता विद्यार्थ्यांनी लिहून–दिग्दर्शित करून, तिचे संगीत, नृत्य, चित्र, शिल्प यांसह ४० मिनिटांचे नाट्याविष्कार सादरीकरण करायचे आहे.यात सहभागी होणाऱ्या महाविद्यालयाच्या संघातील सर्व कलावंत, लेखक, दिग्दर्शक हे संबंधित महाविद्यालयातील विद्यार्थी असणे व स्पर्धेच्या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयात शिकत असणे बंधनकाकरक आहे. पुणे,नाशिक,जळगाव,अमरावती,अहमदनगर,कोल्हापूर,रत्नागिरी,गोवा, बेळगाव या केंद्रांवर होईल.या केंद्रांवर प्राथमिक फेरी (तालीम स्वरूपात), विभागीय अंतिम फेरी (विभागवार नाट्यगृहात) तर महा अंतिम फेरी मुंबईत घेण्यात येणार आहे. त्याचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर होईल.स्पर्धेसाठी भरघोस रकमेची पारितोषिक देण्यात आली असून एकूण बक्षिसांची रक्कम साडेसात लाख रुपयांच्या आसपास आहे. स्पर्धेचे वेळापत्रक व प्रवेशअर्ज भरण्याची तारीख लवकरच जाहीर होणार आहे.
Leave a Reply