
तर पुढच्या वर्षी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक आहे त्यामध्ये तिथले 40 लाख भारतीय देखील मतदान करणार आहेत, मागच्या निवडणुकीत भारतीयांची पाहिजे तेवढी मतं ट्रम्प यांना मिळाली नव्हती यावेळी तरी मतं मिळावी म्हणून हा कार्य्रकम.आता भारताच्या पंतप्रधानांनी अमेरिकेच्या अध्यक्षांच्या प्रचाराला जाणे हीच लज्जास्पद बाब आहे,पण इवेंट म्हटलं की आमच्या प्रधानप्रचारकाचा अवडतीचा विषय. गेल्या 26 जानेवारीला मोदींनी ट्रम्प यांना प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला बोलावले होते आणि त्यानंतर एप्रिल-मे मधे लोकसभेची निवडणूक होती आणि त्यातून आपला प्रचार करून घ्यायचा असा मोदींचा डाव होता पण ट्रम्प यांनी कार्यक्रमाला दांडी मारली आणि अमेरिकेच्या अध्यक्षांचा दुरूपयोग कोणत्याही राजकारणासाठी होउ दिला नाही.कार्यक्रम सुरु झाला आणि मोदी आणि ट्रम्प स्टेजवर आले,ट्रम्प भाषणासाठी उभे राहीले असता, तिथल्या समुदायाने USA-USA अश्या घोषणा दिल्या. ट्रम्प-ट्रम्प अश्या घोषणा दिल्या नाहीत ते लोके देशप्रेमी असतात व्यक्तिप्रेमी नाही. प्रधानप्रचारक बोलायला उभे राहीले आणि नेहमी प्रमाणे लोकांनी मोदी-मोदी च्या घोषणा दिल्या आणि प्रधानप्रचारकांचा चेहरा अगदी खुलून गेला.स्वतःची वाह-वाह त्यांना नेहमीच आवडते.
आता ट्रम्प यांनी त्यांच्या प्रचारासाठी केलेल्या भाषणताले मुद्दे ऐका,
1)मी माझ्या कार्यकाळात 60 लाख नवे रोजगार तयार केले.
2)17000 रोजगार ह्यूस्टन सिटी मधे निर्माण केले(जिथे कार्यक्रम होता)
3)बेरोजगारिचा दर ईतिहासात सगळ्यात कमी करून एक रिकॉर्ड बनवला(ह्यूस्टन सिटी)
4)बेरोजगारीचा दर अमेरिकेत गेल्या 51 वर्षात सगळ्यात कमी करण्याच काम केला.
5)गेल्या दोन वर्षात भारतीय अमरीकन लोकांचा बेरोजगारीचा दर 33%नी कमी केलाय.आता आमचे प्रधानप्रचारक खाली बसून विचार करत असतील की निवडणुकीच्या प्रचारात अस विकास कामांविषयी बोलावे लागते हे तर मला अत्ता कळतय.मी तर नेहमी नेहरू,गांधी,पवार पवारच करत असतो.
Leave a Reply