
कोल्हापूर : सहकार क्षेत्रात गेली १०३ वर्षे आपल्या प्रगतीचा आलेख चढता ठेवणारी अग्रगण्य आणि ५६५ कोटी रुपयांच्या ठेवींचा उच्चांक गाठणारी कोल्हापूर को-ऑप अर्बन बँक आपला शतकपूर्ती सांगता सोहळा करत आहे.या निमित्ताने सभासदांना भेट वस्तू प्रदान तसेच बँकेच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशन ज्येष्ठ नेते माजी कृषी मंत्री खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्रातील पहिली सहकारी चळवळ अर्बन बँकेच्या रूपाने कोल्हापूर जिल्ह्यात उदयास आली असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी केले.खासगी सावकाराकडून होणारी पिळवणूक थांबावी यासाठी शाहू महाराजांनी भास्करराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या बँकेची स्थापना केली.त्यांच्याच विचारांचे तंतोतंत पालन करत १०३ वर्षाच्या कालावधीत बँकेने प्रचंड प्रगती केली आहे.नागरी क्षेत्रातील हि पहिली बँक असून संपत्तीपासून नेहमीच दूर राहिलेल्या लोकांनी एकत्र येऊन या बँकेची स्थापना केली.आणि परिवर्तनाचा आदर्श समोर ठेवला.बँकेचे नेतृत्व करणाऱ्या माणसांमध्ये महाराष्ट्र चालविण्याची ताकद आहे.कोल्हापूरचा विकास घडविण्याची भूमिका बँकेने घेतली.आणि शून्य टक्के एनपीए राखून ती भूमिका यशस्वी केली आहे.सहकार दुर्बल घटकांसाठी आहे.याच्या मागे राज्यशासनाने उभे राहिले पाहिजे.सरकारने आर्थिक शक्ती सहकारच्या मागे उभी केली पाहिजे तसेच सध्याच्या आरबीआयच्या धोरणांबाबत चिंता वाटते अशी भूमिका सहकार क्षेत्राबद्दल आज शरद पवार यांनी मांडली.कोल्हापूरकराना जे पटते त्याच्याच पाठीशी ते उभे राहतात.याचे उत्तम उदाहरण म्हणजे अर्बन बँक असेही ते म्हणाले.
सर्व मापदंडात सर्व निकष पूर्ण करणारी संस्था हीच खरी चांगली संस्था असते.अर्बन बँकेने हे सर्व निकष पूर्ण केले आहेत.असे उद्गार सहकार आणि सार्वजनिक मंत्री तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काढले.यावेळी आमदार हसन मुश्रीफ, छत्रपती शाहू महाराज,कोल्हापूरच्या प्रथम नागरिक महापौर सौ.अश्विनी रामाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमास उपाध्यक्ष पी.टी.पाटील,संचालक शिरीष कणेरकर,शिवाजीराव कदम,यशवंत साळोखे,जयसिंगराव माने,राजन भोसले,मधुसूदन सावंत,केदार कुंभोजकर,मोहन पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी सुबराव पवार, जनरल मनेजर सुरेश चौगुले,बाजीराव खरोशे,भाऊसो कांबळे यांच्यासह संचालक,पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
Leave a Reply