
कोल्हापूर :”9 स्टार प्राइम एन्टरटेन्मेंट” ची निर्मिती असलेला “702 दिक्षित’स” हा सनसनाटी थरारपट, नवीन वर्षात, 15 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे निर्माते आहेत. प्रेक्षकांना दोन तास खिळवून ठेवणाऱ्या या चित्रपटात, गौरी निगुडकर, पल्लवी पाटील, विजय आंदळकर, जयवंत वाडकर, श्रीरंग देशमुख, रुची जाईल आणि विक्रम गोखले या अभिनेत्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाचे कथालेखन रोहित जाईलयांनी केले आहे, तर पटकथालेखन केले आहे ऋतुराज धलगडे यांनी, हृषिकेश कोळी यांनी, चित्रपटासाठी संवाद लेखन केले आहे. छायाचित्र दिग्दर्शन सांभाळले आहे सुरेश बीस्वेनी यांनी, कला दिग्दर्शक आहेत अमित बेंबलकर, तर वेशभूषा साकारल्या आहेतअनिशा थापा यांनी, चित्रपटाचे कला निर्माता आहेत जमशिद रूइन्टन.
चित्रपटातील गीते प्रियंका बर्वे, हृषिकेश रानडे, निमिषा देब, विश्वजीतबेंबलकर , स्वप्नजा लेले या पार्श्वगायकांनी गायली असून, डॉ. राहुल देशपांडे, विशाल राणे यांनी गीतलेखन तर, पार्श्वसंगीत आणि या गीतांना स्वरसाजशुभंकर चढवला आहे .
Leave a Reply