
कोल्हापूर : अनेक चित्रपटात आपले वेगळेपण दर्शविणारा लँड १८५७ या वास्तववादी चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक विषयाची हाताळणी केली गेली आहे. फार कमी चित्रपटात असे विषय हाताळले जातात असे मत चित्रपटाच्या निर्मात्या विजयालक्ष्मी जाधव यांनी चित्रपट मुहूर्तावेळी व्यक्त केले.दिग्दर्शन सुनील कसबे यांचे असून चित्रपटात गावातील सावकारी,शेतकरी,प्रेम या सर्वांचा मिलाप दिसून येईल असे ते म्हणाले.कोल्हापूर शहराजवळील कुशिरे या गावात या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे.त्यानिमित्त चित्रपटाची टीम यामध्ये शंभरहून अधिक कलाकारांचा समावेश आहे.शशांक शेंडे,जयंत सावरकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.चित्रपटाचे कार्यकारी निर्माता पद्माकर नष्टे यांचे असून ग्रामीण कथानक हे लोकांच्या जिव्हाळ्याचे आहे.त्यामुळेच हा चित्रपट लवकरात लवकर प्रदर्शित होणार असून तो प्रेक्षकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल असा विश्वास संपूर्ण टीमने व्यक्त केला.
Leave a Reply