महालक्ष्मी किरणोत्सव अडथळे शोधणेच्या कामाची महापौरांकडून पाहणी

 

कोल्हापूर: महालक्ष्मी मंदीरातील किरणोत्सवातील अडथळे IMG-20160119-WA0001शोधणेच्या कामाची तसेच ताराबाई रोड व महाद्वार रोडवरील फेरीवालांची पाहणी आज महापौर सौ.अश्वीIMG-20160119-WA0001नी रामाणे यांनी संबधीत अधिकाऱ्यासमवेत केली.

    महापालिकेमार्फत केआयटी कॉलेजच्या माध्यमातून किरणोत्सवातील अडथळयाचा अभ्यास करणेचे काम केआयटी महाविद्यालयास सोपविले आहे. याकामी महापालिकेने आवश्यक जागेचा नकाशा देणेत आला होता. परंतु केआयटीस डिटीटल नकाशाची गरज असलेने डिजीटल नकाशा उपलब्ध करुन दिला आहे.  त्यानुसार काम सुरु आहे. या कामाची महापौर सौ.अि­ानी रामाणे यांनी पाहणी केली.
यावेळी त्यांनी या कामाबाबत महापालिकेमार्फत सर्वातोपरी मदत करण्याची ग्वाही दिली.
तसेच महालक्ष्मी मंदीर परिसरातील महाद्वार रोड व ताराबाई रोडची पाहणी केली. यावेळी या रस्त्यावरील फेरीवाल्यांची मते महापौरांनी जाणून घेतली. फेरीवाल्यांनी रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणेसाठी पट्टे मारुन द्यावेत. आम्ही पट्टयाच्या आत व्यवसाय करुन रहदारी अडथळा न करता व्यवसाय करु अशी मागणी केली. यावेळी महापौरांनी महापालिकेने निश्चित केलेल्या हॉकर्स झोनमध्येच फेरीवाल्यांनी व्यवसाय करावा असे आवाहन केले.
यावेळी गटनेता शारंगधर देशमुख, नगरसेविका सौ.उमा बनछोडे, दिपा मगदूम, सौ.वृषाली कदम, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले, उपशहर अभियंता एस.के.पाटील, इस्टेट ऑफिसर प्रमोद बराले, अतिक्रमण विभाग प्रमुख पंडीत पोवार, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, सचिन चव्हाण, उदय गायकवाड, केआयटी कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!