
कोल्हापूर : अस्थिरोग क्षेत्रात विश्वसनीय सेवा देणाऱ्या नॉर्थ स्टार हॉस्पिटलच्या वतीने २६ जानेवारीचे औचित्य साधून सकाळी ९ ते ११ या वेळेत वॉकेथॉन २०१६ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे.अलीकडच्या काळात बैठी जीवन पद्धती व्यायामाचा अभाव यामुळे सांधेदुखी,गुडगेदुखी सारखे आजार उद्भवतात.म्हणूनच नियमित व्यायाम आणि चालावे याचा प्रचार करण्यासाठी अशा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती अस्थिरोगतज्ञ डॉ.दिपक जोशी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.४० ते ६० वर्षे,६० वर्षापुढील आणि कृत्रिम सांधे रोपण झालेले नागरिक अश्या तीन गटात नावनोंदणी करण्यात येत आहे,तसेच निरोगी सांध्यांसाठी डॉ.दिपक जोशी यांचे व्याख्यान आणि अस्थी घनतेची मोफत तपासणी केली जाणार आहे.
त्याचप्रमाणे सर्वसामान्य आणि गरजू रुग्णांना गुडग्यावरील शस्त्रक्रिया करण्यासाठी लाखो रुपयाचा खर्च येतो.पण हॉस्पिटलच्या वतीने डॉ.मा.ना.जोशी फौंडेशनअंतर्गत विशेष योजना सुरु केली आहे.यात गुडगा शस्त्रक्रिया फक्त ९९ हजार इतक्या माफक दरात होणार आहे.१ ते २६ जानेवारी दरम्यान या शस्त्रक्रिया केल्या जाणार असल्याने तसेच या योजनेअंतर्गत कृत्रिम सांधेरोपण करता येणे शक्य असल्याने गरजूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.रोज किमान ६ किमी.डॉक्टरांच्या सल्ल्याने चालावे.व्हिटामिन आणि प्रोटीनचा आहारात जास्त वापर करावा.तरच आपण निरोगी आणि दीर्घायुषी राहू असा मोलाचा सल्लाही डॉ.दिपक जोशी यांनी दिला.पत्रकार परिषदेला हॉस्पिटलमधील डॉक्टर्स आणि कर्मचारी उपस्थित होते.
Leave a Reply