कोल्हापूर :17 जानेवारी 2016 इ.रोजी आयुक्त पी.शिवशंकर यांचे मार्गदर्शनाखाली कोल्हापूर शहरात राबविणेत आले. या मोहिमेस शहरातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
या मोहिमेचे उद्घाटन महापौर सौ.अश्वीनी रामाने यांचे हस्ते सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथे सकाळी 8 वाजता करणेत आले. याप्रसंगी उपमहापौर सौ.शमा मुल्ला, विरोधी पक्ष नेता संभाजी जाधव, उपायुक्त ज्ञानेार ढेरे, शासनाचे पर्यवेक्षक डॉ.हर्षदा वेदक, स्थानिक नगरसेवक सचिन पाटील, आरोग्याधिकारी डॉ.दिलीप पाटील, आरसीएच नोडल ऑफिसर डॉ.अमोलकुमार माने, प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी सावित्रीबाई फुले हॉस्पिटलचे डॉ.अरुण वाडेकर, जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी, तसेच रोटरी क्लबचे सदस्य व भागातील नागरीक उपस्थित होते.
या मोहिमेमध्ये एकूण 47,523 बालकांना डोस पाजणेचे उद्दिष्ट होते पैकी 41,873 इतक्या बालकांना पोलिओचे डोस पाजणेत आले. या मोहिमेकरीता शहरात 172 लसीकरण बूथ स्थापन करणेत आले होते. या मोहिमेमध्ये सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत डोस पाजणेत आले.
कुटुंब कल्याण/नागरी आरोग्य केंद्रांकडील वैद्यकीय अधिकारी डॉ.एम.बी.पाटील, डॉ.योगीता भिसे, डॉ.शोभा दाभाडे, डॉ.रुपाली यादव, डॉ.सुनंदा नाईक, डॉ.बाळासो कोळी, डॉ.निर्मलकुमार नेमाणे तसेच आरोग्य कर्मचारी यांनी या मोहिमेची यशस्वीपणे अंमलबजावणी केली. याकरीता आयुक्त पी.शिवशंकर यांनी आरोग्याधिकारी डॉ.दिलीप पाटील यांचे सोबत दिवसभर सर्व केंद्रांना भेटी देऊन मोहिमेबाबत माहिती घेतली. यामध्ये विशेषत: केंद्र क्र.5 कसबा बावडा, केंद्र क्र.6 महाडिक माळ, उंचगांव नाका, आंबेडकर हॉल, राजेंद्र नगर, केंद्र क्र.7 आयसोलेशन हॉस्पिटल, केंद्र क्र.2 फिरंगाई, केंद्र क्र.1 सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, इ.ठिकाणच्या केंद्रांना भेटी देऊन केंद्रावरील अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.
Leave a Reply