
कोल्हापूर : चैनीसाठी मोटर सायकली चोरून विकणारी टोळी आज शाहूपुरी पोलिसांनी गजाआड केली.त्यांच्याकडून ४ लाख ९५ हजार रुपयाच्या ११ मोटर सायकली हस्तगत करण्यात आल्या.एकूण ३ जणांच्या टोळी असून नारायण शिंदे (वय २१),रा.हळदी कांडगाव,निखील दुधाणे(वय १९) रा.इचलकरंजी,आणि सोहेल नदाक ( वय २०) रा.विक्रम नगर इचलकरंजी अशी त्यांची नावे आहेत.त्यांनी कोल्हापूर,इचलकरंजी,हातकणगले, या परिसरातून तब्बल ११ मोटर सायकली चोरून विकल्या होत्या.असे निष्पन्न झाले आहे.
शाहूपुरी पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी,गुन्हे शोध पथकातील अमर अडूळकर, बजरंग हेब्बळकर,समीर मुल्ला,अरविंद पाटील,विशाल बेंद्रे यांनी याचा तपास करून कारवाई केली.
Leave a Reply