
कोल्हापूर : आज सकाळी ७ वाजणाच्या सुमारास मिलेटरी कँटीन येथे झालेल्या अपघातात अत्ताउल्ला नियाज चमनशेख ( वय २०) हा तरुण जागीच ठार झाला.अधिक महिती अशी की चमनशेख याच्या वडिलांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे.सकाळी अत्ताउल्ला वडिलांच्या टेम्पोबरोबर त्याच्या चुलत भावाला आणण्यासाठी निघाला होता.मोरवाडी शिवाजी विद्यापीठ मार्गाने जात असताना मिलिटरी कँटीनजवळ आला असता त्याचा मोटर सायकलवरील ताबा सुटल्याने ती दुभाजकाला धडकली त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याची नोंद राजारामपुरी पोलीस स्टेशनला झाली आहे.
Leave a Reply