
कोल्हापूर : कोल्हापूर- रत्नागिरी मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली असताना शिवाजी पुलावर सतत वाहतुकीची कोंडी होत असते.त्यातून छोटे-मोठे अपघातदेखील होत असतात.शिवाजी पुलाच्या पर्यायी पुलाचे बांधकाम मागील वर्षापासून सुरु आहे.पूल पूर्ण बांधून तयार झाला तर वाहतुकीची कोंडी सुटेल.पण कोल्हापुरात कोणतेही विकास काम हे अडथळे आल्याशिवाय पूर्ण होताना दिसत नाही.संबंधित खात्याच्या अधिरकाऱ्यांच्या अनास्थेमुळे हे काम रखडले आहे.सुरु झालेले काम अशा प्रकारे थांबणे यातच डल्ला मारण्याची प्रवृत्ती दिसून येते असा आरोप आज शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी आंदोलनावेळी केला.अशा बेजाबदार अधिकारी व कर्मचारी वर्गामुळे कोल्हापूर बदनाम होत आहे.तरी पालकमंत्री यांच्यासह लोक प्रतिनिधींनी यात पुढाकार घेऊन पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत.याचा आर्थिक बुर्दंड कोल्हापूरच्या जनतेवर लादण्यापेक्षा तो त्या अधिकाऱ्यांच्याकडून वसूल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात सौ.शुभांगी साळोखे.रवी चौगुले.शिवाजी जाधव,प्रवीण पालव,चंद्रकांत संकपाळ यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply