कोल्हापूर : हिमानी हॅपिनेस हब यांच्या वतीने विद्यार्थी विकास प्रकल्पांतर्गत शैक्षणिक प्रगतीसाठी नेहमीच उज्वल भविष्यासाठी प्रेरणा आणि प्रोत्साहन दिले जाते.याचाच एक भाग म्हणून भारतासह आफ्रिकेमध्ये ३ लाखांहून अधिक लोकांना ट्रेनिंग देणाऱ्या हिमानी यांचे ८ वी ते १० वी तसेच ११ वी आणि १२ वी विज्ञान मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट हपिनेस व सक्सेस फॉर्मुला या महासेमिनाराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच चाटे कोचिंग क्लासेसच्या पुढाकाराने हा कार्यक्रम खास विद्यार्थी आणि पालकांसाठी आयोजित केला आहे.२३ जानेवारी रोजी दुपारी ३.३० ते ८.३० आणि २४ जानेवारी रोजी सकाळी ११ ते ४ या वेळेत विद्यार्थ्यासाठी आणि २४ जानेवारी रोजी पालकांसाठी दुपारी ४ ते ७ यावेळेत अप्पाज कॉप्लेक्स येथे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती चाटे कोचिंग क्लासेसचे कोल्हापूर विभागाचे संचालक प्रा.भारत खराटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
या कार्यशाळेमुळे मनाची शांती प्राप्त करण्याचे ज्ञान मिळेल.आपला आत्मविश्वास,निर्णय शक्ती,स्मरण शक्ती,आणि एकाग्रता वाढते.मनातील नकारात्मकता दूर होऊन आपले विचार आणि सिद्धांत सकारात्मक होतील.जीवनात सुख.शांती,समृद्धी,सफलता,स्वास्थ्य,संपत्ती आणि अध्यात्मिकता प्राप्त करण्याचे मार्ग शिकाल.जीवनात समस्यांवर मात करता येईल.इतके सामर्थ्य माणसाच्या आंतरिक शक्तीत असते.फक्त आपल्याला त्याची जाणीव नसते.असे हिमानी यांनी बोलताना सांगितले.नाव नोंदणीसाठी महाजन पब्लिसिटीचे संचालक प्रफुल्ल महाजन यांच्याशी ९५६१६२६६६१ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Leave a Reply