
पुणे : महाटेक – २०१६ हे औद्योगित प्रदर्शन दि. ४ ते ०७ फेब्रुवारी २०१६ दरम्यान सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत कृषी महाविद्यालय पटांगण (नवीन), सिंचन नगर, शिवाजी नगर, पुणे येथे भरणार आहे. देशभरातील उद्योजकांना आपली बुद्धीमत्ता, आधुनिक विचारसरणी आणि आपल्या व्यवसायातील क्षमता वाढवून आधुनिकीकरणाची कास धरण्यासाठी महाटेक २०१६ हे सर्वात योग्य व्यासपीठ आहे. या प्रदर्शनाचे हे १२ वे वर्ष असून याला उत्पादक आणि वितरकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत असतो. या प्रदर्शनामुळे उद्योजकांसाठी नवनवीन संधी उपलब्ध होतात. या निमित्ताने उद्योजक आपली आधुनिक उत्पादने,उपकरणे विपणनासाठी आणि विक्रीसाठी प्रदर्शनात ठेवतात. तसेच इतर उद्योजकांशी व्यावसायिक चर्चा होतात. नवीन उद्योजकांसाठी बाजारपेठ हा मोठा माहितीचा स्त्रोत आहे. यामध्ये देशभरातील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील उद्योजकांचे अद्यावत तंत्रज्ञान, उपकरणे पहाता आणि खरेदी करता येणार आहेत. प्रत्येक क्षेत्रातील उत्पादक यात सहभागी होत आहेत.
महाटेक २०१६ या प्रदर्शनात ३०० पेक्षा अधिक कंपन्या सहभागी होणार असून,त्याला तीस ते चाळीस हजार उद्योजक भेट देतील असा अंदाज आहे. या प्रदर्शनात प्रत्येक क्षेत्रातील उद्योजक सहभागी होत असून मोठ्या उद्योजकांपासुन ते लघु उद्योजकांपर्यत आणि आंतरराष्ट्रीय ब्रॅंडपर्यंत सर्व घटकांचा समावेश आहे. प्रक्रिया, उद्योग उपकरणे , इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग आणि मशीन टूल्स ,तांत्रिक सेवा आणि सल्ला या चार प्रकारामध्ये प्रदर्शनाचे वर्गीकरण करण्यात आले आहे .
या कार्यक्रमाचे आयोजन इंडियन ट्रेड प्रमोशन ऑर्गनाइज़ेशन केले असून इंडो-आफ्रिकन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, कॅम-कॅड पीपल असोसिएशन, उद्योग मंत्रालय महाराष्ट्र, टीआयएसएसआयए व सीओएसआयए यांनी सहकार्य केले आहे.
महाराष्ट्र इंडस्ट्रीज डिरेक्टरीचे संचालक श्री विनय मराठे पत्रकार परिषदेत म्हणाले , ” १२ वे महाटेक प्रदर्शन आयोजित करताना मला आनंद होत आहे. गेल्या काही वर्षांपासून महाटेक प्रदर्शनाने उत्पादन क्षेत्रात चांगली प्रगती करत, स्वत:ला सिद्ध केले आहे. उत्पादकांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य ग्राहक मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. विशिष्ट उद्दिष्ट्ये डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल केल्यास लक्ष्यप्राप्ती होते. अशी उद्दिष्टे सध्या करण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असणार आहोत. ते पुढे म्हणाले की, दरवर्षी नवीन गोष्टी अंतर्भूत करून महाटेक जास्तीत जास्त परिपूर्ण करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. महाटेक हे आता प्रतिष्ठित नाव झाले असून हे पुण्यातील सर्वात मोठे औद्योगित प्रदर्शन म्हणून गणले जाते. महाटेक उत्पादक व ग्राहक यांच्यासाठी महाटेक उत्कृष्ट व्यावसायिक संधी उपलब्ध करून देते.
या प्रदर्शनात भाग घेतलेल्या कोल्हापूर येथील नामांकित कंपन्यांनीओएमटी बेरिंग प्रा. ली, इं डो पार्क, कन्स्ट्रक्शन सर्वी कार्लस्थल क्राफ्टमन, बॉश, आदित्य बिर्ला-हिंदालको, शारंग कॉर्पोरेशन, डब्ल्यूटीआय वेल्डिंग प्रोडक्टस,३एम, ऑटो निक्स ऑटो मेशन, रूटस मल्टीक्लीन, मोनटाना इंटरनॅशनल या व अशा अन्य जागतिक दर्जाच्या कंपनी या प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र इंडस्ट्रीज डिरेक्टरी, गुजरात इंडस्ट्रीज डिरेक्टरी व इल्कोन केबल ट्रे हे प्रमुख प्रायोजक आहेत.
महाटेक प्रदर्शनाच्या निमित्ताने गो ग्लोबल संबंधित “ इंटरनॅशनल ट्रेड व भारतीय कंपन्यांची वाटचाल” या विषयावरील परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमागील काही ठळक उद्दिष्टे पुढील प्रमाणे : आंतरराष्ट्रीय बाजारपेठ समजावून घेणे, संभाव्य निर्यात मुल्यांकन, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात करणे व त्या अनुशंगाने प्रगती, निर्यातीसाठी उत्पादनाचा भाव ठरविणे, निर्यातीतील पैशासंदर्भातील अटी, इ. परिषदेच्या पहिल्या दिवशी इंडो आफ्रिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या सहाय्यने आफ्रिकेतील व्यवसायाच्या संधी यावर गो ग्लोबल ही परिषद होईल. आफ्रिकेतील व्यवसायाच्या संधी यावर ४ आफ्रिकन देशातील राजदूत तसेच आयएसीसीआय चे सेक्रेटरी जनरल आफ्रिकेतील व्यवसायाच्या संधी यावर मार्गदर्शन करतील. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी निर्यात प्रकिया आंतरराष्ट्रीय व्यापार यावर उपस्थितांना आयात निर्यात क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शन करतील. अधिक माहितीसाठी info@maha-tech.com या संकेतस्थळावर किंवा ०२२- २५८३८२०० याक्रमाकांवर संपर्क साधावा.
Leave a Reply