
कोल्हापूर:आज झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये स्थायी समितीसाठी 16 सदस्य, परिवहन समिती समितीसाठी 12 सदस्य, महिला व बाल कल्याण समितीसाठी 9 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. सर्व समितीसाठी गटनेत्यांनी आपआपल्या पक्षांच्या
सदस्यांची नांवे सभागृहामध्ये महापौर सौ.अश्वीनी रामाणे यांचेकडे सादर केली. स्थायी समितीसाठी कॉग्रेस पक्षातर्फे निलोफर आजगेकर, शोभा बोंद्रे, रिना कांबळे, जयश्री चव्हाण, दिपा मगदूम, ताराराणी आघाडीतर्फे सत्यजित कदम, निलेश देसाई, रुपाराणी निकम, मेहजबीन सुभेदार, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातर्फे सुरमंजिरी लाटकर, मुरलीधर जाधव, सुनील पाटील, भारतीय जनता पार्टीतर्फे अजित ठाणेकर, उमा इंगळे, मनिषा कुंभार व शिवसेनेतर्फे प्रतिज्ञा निल्ले यांची नियुक्ती करण्यात आली.
परिवहन समितीसाठी कॉग्रेस पक्षातर्फे उमा बनछोडे, लाला भोसले, प्रविण केसरकर, शोभा कवाळे, ताराराणी आघाडीतर्फे सुनंदा मोहिते, शेखर कुसाळे, सुहास देशपांडे, राष्ट्रवादी पक्षातर्फे सचिन पाटील, चंद्रकांत सुर्यवंशी, भारतीय जनता पार्टीतर्फे विजयसिंहखाडे-पाटील, सयाजी आळवेकर व शिवसेनेतर्फे नियाज खान यांची नियुक्ती करण्यात आली.
महिला व बालकल्याण समितीसाठी कॉग्रेस पक्षातर्फे वनिता देठे, छाया पोवार, वृषाली कदम, राष्ट्रवादी पक्षातर्फे सरिता मोरे, वहिदा सौदागर, ताराराणी आघाडीतर्फे अर्चना पागर, कविता माने, भारतीय जनता पार्टीतर्फे सविता भालकर, गिता गुरव यांची नियुक्त करण्यात आली
Leave a Reply