
कोल्हापूर : सागर 2000 कंपनीचा 18 लाख 73 हजार सहाशे रुपयांचा अवैधरित्या गुटखा आणताना पोलिसांनी सापळा रचून पकडला.हैद्राबादहुन रत्नागिरी येथे मिरचिच्या पोत्यांखाली लपवून हा गुटखा नेण्यात येत होते.TS12 UA1036 नंबर च्या ट्रकने हा माल नेण्यात येत होता. ट्रक सांगली फाटा येथे आला असता पोलिसांनी हा ट्रक पकडला.गुटख्याची 40 पोती जप्त करण्यात आली.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे आणि पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
Leave a Reply