
कोल्हापूर :कोल्हापूरमधिल वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांना असुरक्षित रित्या घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन 48 विद्यार्थी जखमी झाले आहेत या पैकी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे कोल्हापूरातील गांधीनगर येथील निगदेवाडी या ठिकाणी हा अपघात झाला .छत्रपती युवराज शाहू महाराज हायस्कुल गांधीनगर .या शाळेच हे सर्व विद्यार्थी आहेत वसगडे येथील शाळेत वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित आयोजित कार्यक्रमासाठी ते जात होते.मालवाहतूक करणाऱ्या टेम्पो मधून शिक्षक त्यांना घेऊन जात होते रस्त्यावरील वळणावर चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला.जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत .
Leave a Reply