कोल्हापूर :- कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रण विभागाकडून दि.27 जानेवारी 2016 पासून रस्त्यावरील नादुरुस्त बंद वाहने हटविणेची मोहिम राबविणार आहे.
शहरामध्ये ठिकठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर नादुरुस्त/ बंद जुनी वाहने बऱ्याच वर्षापासून रहदारीस अडथळा होईल अशा रितीने उभी करण्यात आली आहेत. अशा प्रकारे उभी करण्यात आलेली वाहने दि.27 जानेवारीपासून हटविणेची मोहिम महापालिकेच्यावतीने राबविण्यात येत आहे.
तरी रस्त्यावर नादुरुस्त /बंद पार्किग केलेल्या वाहनांच्या मालकांनी आपली वाहने रस्त्यावरुन हलवून ती स्व:मालकीच्या जागेमध्ये पार्किंग करावीत. अन्यथा सदरची वाहने महापालिकेमार्फत क्रेनचे साहय्यने उचलून नेवून जप्त करण्यात येतील असे महापालिकेच्यावतीने कळविण्यात आले आहे.
Leave a Reply