
कोल्हापूर :भिमा ऊद्योग समूह आणि क्रिएटिव्ह इव्हेंट्स आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील भव्य भिमा कृषी प्रदर्शनाचे आज शानदार उद्घाटन झाले.माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते उद्घाटन झाले.माजी जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ,आमदार संध्यादेवी कुपेकर,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील,माजी आमदार के.पी.पाटील, गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील,अरुण नरके,सौ.अरुंधती महाडिक,रामराजे कुपेकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत्त या प्रदर्शनास प्रारंभ झाला.मेरी वेदर ग्राउंड येथे भरलेल्या प्रदर्शनात नाविन्यपूर्ण उपक्रमासह दुष्काळ परिस्थितीत पाण्याचे नियोजन कसे करावे यासाठी खास मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच जिह्यातील ३६ ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्या.त्या सर्व ग्रामपंचायतीनचा प्रत्येकी १० लाख रुपये देऊन सन्मान करण्यात आला. देशातील तसेच परदेशातील आघाडीच्या संशोधनपर उपयुक्त शेती साहित्य निर्माण करणाऱ्या रिलायन्स पोलीमर्स यांचे प्रायोजकत्व लाभलेल्या या प्रदर्शनात देश-विदेशातील नामांकित कंपन्यांचा सहभाग असणार आहे.पशुपक्षी खास दालनमध्ये संकरीत म्हैशी,कुक्कुटपालन,वैशिट्यपूर्ण चीनी कोंबड्या यांचा समावेश असणार आहे.डॉ.बावराकर प्रा.ली.चे सह प्रायोजकत्व,शासनाचा कृषी विभाग,एन.सी पीएच आणि कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स यांचे सहकार्य लाभले आहे.२०० हून अधिक महिला बचत गटांना मोफत स्टॉल्स,दुपारी सर्वाना मोफत झुणका भाकरी देण्यात येणार आहे.जिल्ह्यातील प्रायोगिक तत्वावर नवीन संशोधन करणाऱ्या शेतकरी बांधवांचा सत्कारही केला जाणार आहे.शेतकयांच्या हितासाठी आणि त्यांच्या समस्या ,प्रश्न यांचे निर्सन व्हावे व नवीन प्रगत तंत्रज्ञानाचा त्यांना लाभ मिळावा यासाठी या प्रदर्शनाचे दरवर्षी आयोजन केले जाते.आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या १० मुलांचा पुढील शैक्षणिक खर्च मोफत करण्याचा मानस आहे.असे खासदार धनंजय महाडिक यांनी प्रस्तावना करताना सांगितले.
Leave a Reply