
कोल्हापूर: जायंट्स इंटरनॅशनल या अंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भारतीय प्रस्थापित सेवाभावी संस्थेशी संलग्न असलेल्या फेडरेशन २ क मधील जायंट्स ग्रुप ऑफ रंकाळा चौपाटीसह अन्य ग्रुपचा शपथविधी तसेच पदग्रहण सोहळा आज पार पडला.सेवा कृती या ब्रीदवाक्यातून साकारलेली विविध सामाजिक उपक्रम सतत राबवित असते.
एन.सी.सी.कमांडर प्रा.रूपा शहा.अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या हस्ते मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला.
२०१६ च्या नूतन कार्यकारिणी व सभासद निवडीमध्ये जायंट्स ग्रुप ऑफ रंकाळा चौपाटीच्या नूतन अध्यक्षा सौ.शारदा चेट्टी,जायंट्स ग्रुप ऑफ छ.शाहू निगवे दुमालाच्या अध्यक्षा सौ.वंदना अस्वले,यंग जायंट्स ग्रुप ऑफ रंकाळा चौपाटीच्या अध्यक्षा कु.दिव्या माळी,मिनी जायंट्स ग्रुप ऑफ रंकाळा चौपाटीच्या अध्यक्षा कु.शाल्वी मोहिते यांच्यासह संपूर्ण कार्यकारिणीचा शपथविधी व पदग्रहण सोहळा समारंभपूर्वक पार पडला.याचवेळी नगरसेविका सुनंदा मोहिते,शोभा बोंद्रे,माजी नगरसेवक सतिश लोळगे,महिला पत्रकार सौ.सुनंदा मोरे,शुभांगी तावरे, स्नेहल मठपती,गोरक्षनाथ कालेकर,सौ.गौरी कालेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.जायंट्स गुप ऑफ रंकाळा चौपाटीचे नूतन संचालक मंडळ यात सुनंदा मोरे,दिपक जोशी,अप्पासाहेब कोकितकर,पूनम माने उदय माळी,शंकर शिंदे,सरिता सुतार,सुनील बराले,पद्माकर कापसे,प्रेमा बोरगे,स्नेहल मठपती,वसंत शेंदुर्णीकर,जहांगीर अत्तार आणि प्रकाश मोहिते यांची निवड करण्यात आली आहे.कार्यक्रमास सर्व जायंट्स ग्रुपचे कार्यकारिणी सदस्य.पदाधिकारी.सल्लागार समितीच्या बबिता जाधव यांच्यासह सल्लागार समिती सदस्य आणि मान्यवर यांची उपस्थिती होती.
Leave a Reply