
कोल्हापूर :गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणासाठी विशेष सरकारी वकील म्हणून हर्षद निंबाळकर यांची नेमणूक करण्यात आली आहे.समिर गायकवाड यांच्या जामिनावर सुनावनी आता 28 जानेवारी ला होणार . विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांच्यासह दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाल्याने आता 28 जानेवारीला अंतिम सुनावणी होणार आहे.समीर गायकवाड ला जामिन मिळणार की नाही याचा निर्णय 28 ला होणार आहे.
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्याहत्या प्रकारांची सुनावणी नुकतीच जिल्हा सत्र न्यालायाकड वर्ग करण्यात आलीय.जिल्हा सत्र नायाधीश एल डी बिले यांच्या समोर हि सुनावणी सध्या सुरु आहे.आज समीरचे वकील एस यु पटवर्धन यांनी त्याच्या जामीनासाठीचा अर्ज बिले यांच्या समोर सादर केला.समीर विरोधात सबळ पुरावे सापडलेले नाहीत त्याच बरोबर तीन महिने समीर पोलिसांच्या ताब्यात असून हि गुन्ह्यातील मोटारसायकल आणि हत्यार पोलिसांना जप्त करता आले नाही.या वरून समीर च्या या गुह्यातील सहभाग स्पस्थ होत नाही त्यामुळ त्याचा जमीन अर्ज मंजूर करावा अशी लेखी विनंती त्यांनी केली होती.यांनतर न्यायाधीश एल डी बिले यांनी या बाबत २० नोहेंबर पर्यंत लेखी म्हणणे मांडण्याच्या सूचना सरकारी वकिलांना दिल्या होत्या.या नंतर सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी आपल समीर च्या विरोधातील लेखी म्हणणे न्यायाधीश बिले यांच्या समोर सादर केल.समीर गायकवाड यान आपले साथीदार तसच गुन्हातील हत्यार आणि वाहन बद्दलची माहिती पोलिसांना दिली नाही.त्याच बरोबर मडगाव बॉम्ब स्फोट प्रकारातील फरारी आरोपी रुद्र्गोंडा पाटील याच्यासाही समीर चे मैत्रीपूर्ण संबंध आहेत हे या पूर्वीच तपासात उघड झाल आहे.त्यामुळ समीर ला जमीन मिळाल्यास तो हि फरारी होऊ शकतो.तसच साक्षीदारावर दबाव आणण्याचा प्रयत्न त्याच्या कडून केला जावू शकतो त्यामुळ समीर चा जामीन अर्ज फेटाळावा अशी विंनती बुधले यांनी केली होती.आज या संदर्भातील दोन्ही पक्षांचा युक्तिवाद बिले यांच्या समोर सादर केला जाणार होता
दरम्यान कॉम्रेड गोविंद पानसरे खून खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून हर्षद निंबाळकर यांची नियुक्ती करावी आशि मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडेपानसरे कुटुंबियांनी काही दिवसापूर्वी केली होती. या मागणीची दखल घेऊन गोविंदराव पानसरे खटल्याकामी निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली. सरकारी वकील चंद्रकांत बुधले यानी या बाबतचे पत्र जिल्हा सत्र न्यायाधिश एल. डी. बिले यांच्या कोर्टात सादर केल. बरोबर सुनावणी वेळी सगळ्या पक्षाच्या वकिलांनी कोर्टात हजर रहाव आशि सुचना केली आता पर्यंत पोलिसांनी केलेल्या तपासात समीरचा या गुन्ह्यातील सहभाग असल्याचं निषपन्न झालेलं नाही.
विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त केलेले हर्षद निंबाळकर आज न्यायालयापुढे युक्तिवाद केला.अंतिम सुनावणी कडे आता सगळ्यांच लक्ष लागलंय.
Leave a Reply