
कोल्हापूर : किराणा माल आणि घरगुती सामान खरेदी करण्यासाठी होणारी दगदग थांबविण्यासाठी तसेच पुण्या-मुंबई सारखे कोल्हापूरही शहरीकरण वाढले आहे.नोकरी व्यवसायानिमित्त लोक आपल्या कामातून वेळ काढू शकत नाहीत.म्हणूनच फक्त एका क्लिकवर आपण आपले घरगुती सामान घरपोच मिळवू शकता EzyGrocery.inद्वारे.कोल्हापुरातील पहिली आणि एकमेव वेबसाईट आहे जी फक्त काही तासात आपल्याला हव्या असलेल्या वस्तू किफायतशीर, माफक व योग्य दरात आपल्याला मिळणार आहेत.अशी माहिती व्यवस्थापक विशाखा देसाई,अमित चौगुले,अमोल चौगुले आणि सागर वडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. वेबसाईट आणि अप्लिकेशन स्वरुपात EzyGrocery.in उपलब्ध आहे.धान्य,डाळी, बेकरी,शीतपेये,खाण्याचे पदार्थ,आंघोळीचे आणि घर साफ करण्याचे साहित्य यासह १ हजारपेक्षा जास्त वस्तू इथे उपलब्ध आहेत.लवकरच ताज्या भाज्या आणि फळेसुद्धा उपलब्ध करणार आहे असेही ते म्हणाले.गेल्या २ महिन्यापासून प्रायोगिक तत्वावर सुरु केल्यानंतर १०० हून अधिक लोकांनी याचा लाभ घेतला आहे.
२६ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान १ हजार रुपयांपेक्षा जास्त खरेदी करण्याऱ्या ग्राहकांना २ किलो साखर मोफत मिळणार आहे.ग्राहकांच्या विनंतीनुसार EzyGroceryची टीम सर्व वस्तू उपलब्ध करून देणार आहेत.यासाठी मोबाईलवरुन किंवा whatapp वरून मेसेज करून आपण आपली ऑर्डर ९१४६८३४३३२/ ०२३१- २३२२९२२ या क्रमांकावर नोंदवू शकता.
Leave a Reply