मुठभर भांडवलदारांच्या जीवावर राष्ट्र बलशाली होवू शकत नाही : चरेगावकर

 
कोल्हापूर : मुठभर भांडवलदारांच्या जीवावर राष्ट्र बलशाली होवू शकत नाही. भांडवलशाही आणि समाजवादी यासारख्या व्यवस्था काही देशांनी स्वीकारल्या आहेत. पण यातून मिळणारा नफा हा भांडवलदारांच्या हातात जातो. त्यामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब होत जातो पण सहकार ही संमिश्र अर्थव्यवस्था आहे. सहकारातून मिळणारा नफा हा समाजात विभागला जातो. म्हणूनच सहकाराशिवाय पर्याय नाही. अमेरिकासारख्या बलाढ्य देशात सहकारी तत्वांचा विचार केला जात आहे. सहकारी चळवळ महत्त्वाची आहे. संस्कारापासून हि चळवळ वंचित राहिल्याने बदनाम झाली. कॉम्रेड ए बी वर्धन यांच्या सारख्या सहकार क्षेत्रात उलेखनीय कार्यामुळे या चळवळीला चांगले दिवस आले. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकरी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी एम.एस.ई वर्कर्स फेडरेशनच्या अधिपत्याखालील वीज मंडळ सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या सुवर्णमहोत्सवी समारंभात बोलताना केले. समारंभाचे उद्घाटन महापौर अश्विनी रामाणे यांच्या हस्ते झाले.  
१९६४ साली स्थापन झालेल्या या संस्थेच्या प्रगतीचा आलेख चढता आहे. ५० वर्षाच्या कालखंडात वर्कर्स फेडरेशनच्या नेतृत्वात संस्थेने उलेखनीय व प्रशंसनिय कामगिरी केली आहे. महाराष्ट्रात सहकार चळवळ वाढली तसेच बदनाम झाली पण त्या धोक्यापासून सावध होण्याची आवशकता आहे. आपल्या कार्यात कसूर केली तर जे सहकार्य व विश्वास मिळवला आहे त्याला गालबोट लागण्याची शक्यता आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या हिताचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्यासाठी वर्कर्स फेडरेशननी सतत पुढाकार घेतला आहे. काही लोक विरोधासाठी विरोध करतात. पण त्यांना वीज कर्मचाऱ्यांनी त्यांना जागा दाखवून दिली आहे. सर्वाना सोबत घेवूनच या संस्थेने अमृतमहोत्सवाकडे वाटचाल केली पाहिजे अशी अपेक्षा वर्कर्स फेडरेशनचे कार्याध्यक्ष मोहन शर्मा यांनी व्यक्त केली. 
नव्या पिढीने रस्त्यावरच्या लढाईत सहभागी झाले पाहिजे. काम केल्यावरच पदे आपोआप मिळतात. नवीन पिढीसाठी मार्गदर्शन म्हणून सांगली आणि यवतमाळ येथे कॉ ए बी वर्धन यांच्या नावे कायमस्वरूपी प्रशिक्षण शिबीर केंद्र उभारण्यात आले आहे असे फेडरेशनचे सरचिटणीस कॉ सी एन देशमुख यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. 
यावेळी फेडरेशनचे अतिरिक्त सरचिटणीस कॉ कृष्णा भोयर, कोल्हापूर परिमंडलाचे मुख्यअभियंता शंकर शिंदे, उपसरचिटणीस कॉ महेश जोत्राव, राज्य उपाध्यक्ष कॉ शिवशंकर भस्मे, केंद्रीय कार्यकारी सल्लागार कॉ ए पी शिंदे, कॉ महादेव जोगळेकर यांची मनोगते झाली. संस्थेच्या मुख्य कार्यालयापासून कार्यक्रमाच्या मुख्यस्थळी लेझीम च्या गजरात रॅली काढली. विद्युत सुरक्षेबाबत अपघात टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील याबाबत घ्यावयाची काळजी कॉ फारुख गवंडी यांनी स्लाईड शो द्वारे दाखवली. संस्थेचे व्हा. चेअरमन सर्जेराव विभूते यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी चेअरमन विनय कोटी, मोहनराव चव्हाण, गोविंद जाधव, सुभाष अडके यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक, पदाधिकारी, वीज कर्मचारी व सेवक मोठ्यासंखेने उपस्थित होते. IMG_20160125_165031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!