हद्दवाढीला संपूर्ण पाठींबा; दालनसारख्या प्रदर्शनाची गरज आहे: खा.महाडिक

 

IMG-20160129-WA0008कोल्हापूर : हद्दवाढीशिवाय कोल्हापूर शहराचा विकास होणार नाही.हद्दवाढीस माझा संपूर्ण पाठींबा आहे.हद्दवाढ झालीच पाहिजे.पुणे आणि सोलापूरसारख्या शहरांची हद्दवाढ झाली पण कोल्हापूर मागे राहिले.मूल्यांकनाच्या स्पर्धेत हे शहर मागे राहिले असले तरी शहर स्मार्ट बनत आहे.स्मार्टच्या स्पर्धेत दर्जा सुधारण्यासाठी क्रिडाई मदत करत आहे.एकाच छताखाली सर्व बांधकामविषयक माहिती मिळते यामुळेच अशा प्रदर्शनाची गरज आहे.असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी क्रिडाच्यावतीने आयोजित दालन २०१६ या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केले. तुम्हीच शहराचे भाग्यविधाते आहात.दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व्यावसायिकांनी योग्य बांधकाम करावे.पाणी वर्षभर वापरता यावे म्हणून रेन वाटर हार्वेस्टिंगचा वापर व्हावा याकडे लक्ष द्यावे. ग्लोबल संतुलीकरणासाठी प्रयत्न करावा.व्यावसायिकांच्या प्रश्नासाठी मी कटिबध्द आहे.असे मत आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.दालन हे क्रिडाईचे व्यासपीठ आहे.कोल्हापूरच्या वैभवात भर टाकत आहे.मंदीतही क्रिडाईला सूर सापडला आहे.कोल्हापूर स्मार्ट सिटी होण्यासाठी मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करेन,केशवराव भोसले नाट्यगृह,न्यायसंकुल पूर्णत्वास नेईन असे उद्गार आमदार बंटी उर्फ सतेज पाटील यांनी काढले.७० टक्के निधी राखीव करण्याचा प्रयत्न करू.सत्तेतील आम्ही गद्दार नाही.विकास आम्हालाही हवा आहे.शिवसेना सर्वांना सोबत घेऊनच जाईल असे प्रतिपादन आमदार चंद्रदीप नरके यांनी केले.

११ मजली इमारत,बी-टेन्युअर सारखे प्रश्न शासनाकडे प्रलंबित आहेत.फाइल्स पेंडिंग आहेत.विमानतळ नसल्याने बाहेरील कंपन्या कोल्हापुरात व्यवसायासाठी येत नाहीत.त्यामुळे विमानतळ आणि बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणी क्रिडाईचे अध्यक्ष महेश यादव यांनी मांडल्या.दालनचे चेअरमन कृष्णा पाटील यांनी दालनविषयी माहिती दिली.एकाच छताखाली सर्व माहिती मिळणारे दालन हे एकमेव प्रदर्शन आहे.प्रदर्शनात १६३ स्टॉल्स असून ८० आयोजक आहेत.असे सांगितले.दीपप्रज्वलनाने प्रदर्शनाचा प्रारंभ झाला.स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आमदार अमल महाडिक,महापौर सौ.अश्विनी रामाणे यांच्यासह क्रिडाचे उपाध्यक्ष राजीव पारीख,सुजय होसमनी,सचिव विद्यानंद बेडेकर,चेतन वसा,संजय डोईजड,निखील शहा यांच्यासह सर्व पदाधिकारी,सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!