
कोल्हापूर : शहरातील दसरा चौक येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत आज दुपारी अचानक गोळीबार झाल्याने बँकेत आलेल्या नागरिकांची धांदल उडाली.याबाबत अधिक माहिती अशी की,सकाळी साडे आकाराच्या सुमारास बँकेत नवीन रुजू झालेले वाचमन शिवाजीराव पाटील यांच्या खांद्याला बँकेच्या सुरक्षिततेसाठी बंदूक अडकवलेली असते.बंदूक अडकविलेल्या पट्ट्याचे रिबीट तुटून अचानक बंदूक जमिनीवर पडली.बंदूक जमिनीवर आडवी पडल्याने बंदुकीतून अचानक एक गोळी सुटली. एक पेंशनर गृहस्थ बँकेत काही कामासाठी आले होते.त्यांच्या दोन्ही पायांच्या मधून ही गोळी उडली.त्यांना किंव्हा इतर कोणालाच जीवितहानी झाली नाही.पण अचानक गोळीबार झाल्याने ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. त्यात आज बँकेचे आज ऑडीट सुरु होते. वाचमन शिवाजीराव पाटील याची मेडिकल तपासणी सुरु आहे.पण स्टेट बँकेसारख्या बँकेची एवढी ढिसाळ सुरक्षा व्यवस्था यामुळे करोडो रुपयांची उलाढाल होणाऱ्या या बँकेच्या सुरक्षिततेवरच आता प्रश्नचिन्ह उभे राहिले
Leave a Reply