कोल्हापुरात ४ फेब्रुवारीला हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन

 

IMG_20160130_124056कोल्हापूर : धर्मधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येत्या ४ फेब्रुवारी रोजी हिंदु धर्म सभेचे आयोजन करण्यात आले आहे.आतापर्यंत १३ राज्यात १ हजाराहून अधिक सभा यशस्वीपणे सभा घेण्यात आल्या आहेत. याच नुसार ४ तारखेला राजारामपुरी येथील महापालिका शाळा क्रमांक ९ च्या मैदानावर सायंकाळी साडे पाच वाजता या सभेचे आयोजन केले आहे.मागील सभांप्रमाणे या सभेलाही हजारो हिंदूंची उपस्थिती असणार आहे.अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक राजन बुणगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गोहत्या,जिहादी,आतंकवाद,धर्मांतर,लव्ह जिहाद,मंदिरांचे सरकारीकरण,हिंदु विरोधी कायदे, आणि हिंदूंच्या सणाला होणाऱ्या दंगली यासारख्या समस्यांनी भारतातील हिंदु त्रस्त झाले आहेत.त्या विरोधात हिंदुना संघटीत करण्यासाठी धर्मजागृती सभांचे आयोजन करण्यात आले आहे असे मधुकर नाझरे यांनी सांगितले.

धर्मसभेला शहर तसेच गावागावातून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या सभेला सनातन संस्थेच्या संत पू.कु.स्वाती खाडये,समितीचे राज्य संघटक सुनील घनवट, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव संजीव पुनाळकर यांचे मार्गदर्शन असणार आहे.या सभेचा प्रसार सर्व स्तरावर केला जात आहे. यासाठीच १ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता शाळा क्रमांक  ९ च्या मैदानावरून शहराच्या प्रमुख मार्गावरून भव्य वाहन फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.या फेरीला त्याचप्रमाणे सभेला हजारो हिंदुनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन हिंदु जनजगृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.पत्रकार परिषदेला डॉ.मानसिंग शिंदे,सुधाकर सुतार,संजय पाटील,शिवाजीराव ससे आणि हिंदु कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!