
कोल्हापूर:पालकमंत्री सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील डॉक्टराना पीपीई किट वाटप सुरू करण्यात आले आहे. या डॉक्टरना स्थानिक नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्ते यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष भेटून त्यांना हे किट देण्याचे नियोजन केले आहे. आज दिवसभरात या एक हजारपैकी पाचशे किटचे वाटप केल्याची माहिती आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली.दोन दिवसात किटचे वाटप पूर्ण करण्यात येईल असेही आ.पाटील यांनी सांगितले.कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच आ.पाटील यांनी हा उपक्रम राबविल्याबद्दल डॉक्टर आणि नागरिकातुन समाधान व्यक्त होत आहे.
कोरोनामुळे नागरिकांना आरोग्यसेवा देताना डॉक्टरना आपल्या आरोग्यचाही काळजी घेणे क्रमप्राप्त झाले होते. आरोग्यसेवा देऊ पण आम्हाला संरक्षण म्हणून पीपीई किट द्यावी, अशी मागणी डॉक्टर करत होते.आमदार पाटील यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिका नगरसेवक तसेच ग्रामीण दक्षिण मधील प्रमुख कार्यकर्ते यांच्याशी व्हिडिओ काँफेरेन्सद्वारे संपर्क साधला होता.त्यावेळी पीपीई किट द्यावीत , असे कार्यकर्त्यांनी सुचविले होते. त्यावेळी आ.पाटील यांनी ही किट उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार ही एक हजार किट त्यांनी तयार करून घेतली आहेत. दक्षिण शहर मधील नगरसेवक आणि ग्रामीण मधील प्रमुख कार्यकर्ते यांच्याशी समन्वय ठेऊन हे किट वाटप केले जात आहे.
याबद्दल आमदार पाटील यांनी सांगितले की, कोरोनाच्या संकटाच्या काळात अनेक घटकांबरोबर डॉक्टर,नर्स आणि सर्व स्टाफ हे देवदूता प्रमाणे काम करत आहेत. शासनातर्फे शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरना पीपीई किट दिले आहे.पण खाजगी डॉक्टरांकडे ही किट उपलब्ध नाहीत. त्यामुळे कोरोनाच्या संसर्ग होण्याच्या कारणामुळे अनेक ठिकाणी खाजगी डॉक्टरांना सेवा देणे शक्य झालेले नाही. रुग्णांना सेवा द्यायची इच्छा असून सुद्धा ते आपले काम पूर्ण ताकदीने करू शकत नाहीत.त्यामुळे बऱ्याच ठिकाणी लोकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
कोरोनाच्या संकटात लोकांना आरोग्यसेवा मिळणे आणि डॉक्टरना सुद्धा कोणताही त्रास होऊ नये, या गोष्टी महत्वाच्या आहेत.याचा विचार करून पालकमंत्री सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित् कोल्हापूर दक्षिण मधील डॉक्टरना हे किट आज वाटप केले आहे.
Leave a Reply