
कोल्हापूर: येथील कोल्हापूर बंगाली सुवर्णकार कारागीर संघाच्या वतीने आज एन ९५ च्या २०० मास्कचे वाटप करण्यात आले.कोल्हापूर बंगालीचे संस्थापक अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात पोलिसांना १७५, तर कोल्हापूर प्रेस क्लबला २५ मास्क देण्यात आले. यावेळी अध्यक्ष बिश्वजित प्रामाणिक, उपाध्यक्ष इंद्रजित सामंत, सचिव मणिशंकर गुरानी, देबाशिष दरिया, राजकुमार गुछाईत यांच्यासह मनोज राठोड, सचिन मुसळे, बाळासाहेब पाटील, हितेश ओसवाल आदी उपस्थित होते.दरम्यान, भवानी मंडप येथे झालेल्या कार्यक्रमात जुना राजवाडाचे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, वाहतूक पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांच्याकडे मास्क सुपूर्द करण्यात आले, तर प्रेस क्लब येथे पदाधिकाऱ्यांकडे मास्क देण्यात आले.
Leave a Reply