
कोल्हापूर : येथील राजस्थानी जैन समाजाच्या वतीने कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी शासनाला १२ लाख ५० हजार रुपयांची मदत देण्यात आली.राजस्थानी जैन समाजाच्या येथील पाच ट्रस्टच्या सभासदांनी यामध्ये आपला सहभाग नोंदविला आहे. यामध्ये श्री संभवनाथ जैन श्वेतांबर ट्रस्ट, गुजरी, श्री मुनिसव्रत स्वामी जैन श्वेतांबर ट्रस्ट, लक्ष्मीपुरी, श्री वासुपूज्य स्वामी जैन श्वेतांबर ट्रस्ट, महावीरनगर, श्री आशापूरण पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट, भक्तिपूजानगर आणि श्री शंखेश्वर पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट, राजारामपुरी. यामध्ये प्रधानमंत्री सहायता निधीसाठी पाच लाख, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच लाख आणि स्थानिक प्रशासन निधीमध्ये दोन लाख ५० हजार अशी १२ लाख ५० हजार रुपयांची मदत देण्यात आली. यावेळी के. जी. ओसवाल, ललित गांधी, नगरसेवक ईश्वर परमार, बिपीन परमार, राजेश निंबजिया, भबूतमल गुंदेशा, बिपीन ओंकारमल परमार आणि उत्तम मांगीलाल ओसवाल आदी उपस्थित होते.दरम्यान, जैन समाजाच्या वतीने कोविड आपत्तीमध्ये लढणारे डॉक्टर, पोलिस, गरीब, निराधार लोकांना जेवण, जीवनावश्यक वस्तू, मास्क इत्यादीचेही वाटप केले आहे.
Leave a Reply