जिल्ह्यात दोन लॅब; बुधवारी एक कार्यान्वित

 

कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये कोरोना संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी  दोन लॅब सुरु होणार आहेत. त्यापैकी एक उद्या सीपीआरमध्ये कार्यान्वित होण्याची शक्यता असून त्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिली.जिल्ह्यामध्ये आज अखेर 9 कोरोना विषाणू बाधित रुग्ण आहेत. त्यापैकी दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.  आणखी एका महिला रुग्णाचा अहवाल पहिला तपासणी अहवाल निगेटिवह आला आहे. दुसरा तपासणी अहवाल आज पाठविण्यात येईल. उर्वरित रुग्णांपैकी तीन रुग्ण हे शाहुवाडी तालुक्यातील उचत येथील आहेत. दोन रुग्ण मुंबईहून कर्नाटककडे जाणाऱ्या कंटेनरमधील आहेत. इचलकरंजीमधील एक रुग्ण आहे. हे सर्व सीपीआरमध्ये उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थीर आह. कोरोनाबाबत जिल्ह्यात विविध उपाय योजना करण्यात येत आहेत असे सांगून जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले,  कोरोना संशयितांचा स्वॅब मिरज येथील लॅबमध्ये पाठविण्यात येत होता. परंतु, तेथील संख्येबाबत पडणारी मर्यादा लक्षात घेऊन जिल्ह्यामध्ये दोन नवीन लॅब सुरु करण्यात येत आहेत. त्यापैकी उद्या एक कार्यान्वित होण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आयसीएमआरला त्याची नोंदणीही पूर्ण झाली आहे. दुसरी लॅब शेंडापार्क येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 24 ते 25 एप्रिलपर्यंत कार्यान्वित होईल. त्यासाठी आवश्यक असणारी यंत्रसामग्री मार्गस्थ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये दोन लॅब कार्यान्वित होत असल्याने कोरोना  संशयितांची तपासणी करण्यासाठी जिल्हा स्वयंपूर्ण होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!