अभिमानस ग्रुपच्या वतीने गावागावात औषध फवारणी

 

कोल्हापूर:सध्याची देशाची परिस्थिती करोना बाधित असल्यामुळे एक सामाजिक बांधिलकी या नात्याने ५००० ली टाकी टँकरला स्वखर्चाने रोग प्रतिबंधकारक फवारणी मशीन बसवून केर्ली ,रजपूतवाडी ,सोनतळी ,चिखली,चिखली-सोनतळी,वडणगे,मोहरे,पडवळवाडी २,सडोलि खालसा ,निगवे ,ज्योतिबा देवस्थान व बाजूचा परिसर , दानेवाडी ,पडवळवाडी,जाफळे , आणी मालेऔषध फवारणी केली आहे . औषध फवारणीची रुंदी २५ ते २७ फूट ठेवून गावातील लहान -मोठा रस्त्यावर फवारणी केली गेली.तसेच ज्या गावानी औषध फवारणीची मागणी येईल त्यानुसार स्वतः डिझेल चा खर्च करून फवारणी केली आहे . जे आर डी टाटा पुरस्काराने सन्मानित व नांगराचे पाच पेटंट नावे असलेले अभिमानस ग्रुपचे चेअरमन श्रीकृष्ण शामराव लोहार (केर्ले) यांनी उत्स्फुर्तपणेे याचे नियोजन केले. या ठिकाणी जंतुनाशक फवारणीचे काम करुन एक आदर्श निर्माण केला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!