
कोल्हापूर :महाविकास आघाडीच्या सरकारने महाराष्ट्रातील सर्वच आर्थिक स्तरातील नागरिकांसाठी नव्याने विस्तारीत महात्मा फुले जीवनदायी आरोग्य लागू केली आहे.सर्वच म्हणजे केशरी रेशनकार्ड धारकासह अगदी पांढऱ्या रेशन कार्डधारकांनासुद्धा पाच लाखापर्यंतचे उपचार यामध्ये मोफत मिळणार आहेत. कॅशलेशच्या रूपात महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय आहे.कारण या योजनेच्या माध्यमातून अगदी छोट्या-छोट्या आजार विकारापासून ते मोठमोठ्या आजार व विकारांपर्यंत अगदी सरकारी दवाखान्या मधून मिळणारे उपचार सुद्धा खाजगी दवाखान्यात मधून मोफत मिळणार आहेत. युनायटेड इन्शुरन्स कंपनीच्या सहयोगातून राज्यांमध्ये सुरू झालेली ही योजना पंधराशे कोटी रुपयांची आहे.
ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली आहे.ज्यावेळी महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाआघाडी सरकार कार्यरत होते, त्यावेळी राजीव गांधी जीवनदायी योजना कार्यरत होती. गेल्या सरकारने या योजनेचे नामकरण महात्मा फुले जीवनदायी योजना असं केलं. त्याच नावाने या योजनेचा आता पुन्हा विस्तार केलेला आहे.सर्वच आजार समाविष्ट असलेल्या या नव्या आणि विस्तारित योजनेचा फायदा राज्यातील सर्वच नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.
Leave a Reply