
कोल्हापूरा: लॉकडाउन मध्ये सुरू असलेली हॉटेल मधील जेवण पार्सल सेवा रात्री 10 पर्यंत सुरू ठेवावी, अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
लॉक डाउनच्या काळात झोमॅटो, स्वीग्गी या माध्यमातून हॉटेल आणि रेस्टॉरंट मधील जेवण आणि इतर खाद्यपदार्थ पार्सल सुविधा सुरू होती.सोशल डिस्टन्स आणि योग्य सॅनिटायझेशन करून हे काम सुरू होते .पण गेल्या दोन दिवसापासून जिल्हाधिकारी यांच्या नवीन आदेशानुसार रात्री 7 नंतर ही पार्सल सुविधा बंद करावी तसेच सम-विषम तारखेला दुकाने सुरू/बंद या दुकानाबाबतचा नियम हॉटेल/ रेस्टॉरंट ला जिल्हा प्रशासन आणि महापालिकेने लागू केला आहे.
पण हॉटेल व्यवसायिकांच्या म्हणण्यानुसार , पार्सल सेवा जरी सुरू झाली असली तरी पूर्वीच्या तुलनेत 15 ते 20 % एवढाच व्यवसाय होतो.शिवाय डाळ, ग्रेव्ही यासारखे पदार्थ हे जास्त टिकत नाहीत .बऱ्याच व्यवसायिकांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलवुन घेतले आहे. दुकानाचे नियम हॉटेल्स आणि रेस्टॉरंटला लावू नयेत कारण ही सेवा जीवनावश्यक स्वरूपात येते, असेही हॉटेल व्यवसायिकांचे म्हणने आहे.
या सर्व गोष्टीची माहिती आमदार ऋतुराज पाटील यांनी जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच हॉटेल/ रेस्टॉरंट पार्सल सेवा रात्री १० पर्यंत सुरू ठेवावी, आणि सम विषम दिवसाचा नियम लागू करू नये , अशी मागणी आ.पाटील यांनी केली आहे
Leave a Reply