
कोल्हापूर:महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून पुण्याहून दोन बस आज रविवार दिनांक 10 मे रोजी दुपारी 12 वाजता दादांच्या उपस्थितीत पुण्याहून कोल्हापूरकडे रवाना करण्यात आल्या. या कोल्हापुरात आलेल्या नागरिकांचे व विद्यार्थ्यांचे स्वागत भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी दसरा चौक येथे स्वागत करण्यात आले. यांनतर यासर्वांना सीपीआर रुग्णालयात पुढील तपासणीसाठी सोडण्यात आले. एकुण 50 विद्यार्थी आणि नागरीक आले त्याचबरोबर कोल्हापूर मधून 15 नागरीक रवाना करण्यात आले.
त्याचबरोबर कोल्हापूर मध्ये अडकलेले नागरीकांना त्याच गाडीमधून रात्री 8 वाजता पुणे येथे पाठवण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, दिलीप मेत्राणी, सुनिलसिंह चव्हाण, प्रग्नेश हमलाई, आशिष कपडेकर, विजय आगरवाल, अक्षय निरोखेकर, शंतनू मोहिते आदी उपस्थीत होते.
Leave a Reply