
कोल्हापूर : कोरोना संसर्गाचे उपचार घेणार्यांसाठी आणि संस्थात्मक विलगीकरण केलेल्यासाठी अजब प्रकाशनाच्यावतीने ग्रंथसंपदा भेट देण्यात आली . अजब प्रकाशनाचे शितल मेहता आणि श्रीपाद वल्लभ ऑफसेटचे आर. डी.पाटील -देवाळेकर यांनी ही पुस्तके ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सुपूर्द केली . या ग्रंथ संपत्तीमध्ये पाचशेहून अधिक पुस्तकांचा समावेश आहे.यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले,
ग्रंथ माणसाला धीर आणि आधार देतात. अंधारल्या दाही दिशा उजळल्या शब्ददीप, या भावनेतून कोरोना व्हायरस च्या लढ्यात अजब प्रकाशनचे साहित्य दातृत्व कौतुकास्पद आहे. कोरोनाच्या विळख्याने हाहाकार वाढला आहे. अश्या अंधारलेल्या दाही दिशामध्ये अजब प्रकाशनाने शब्ददीप लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या प्रयत्नातून लढणा-यांच्या जीवनात प्रकाश पडणार आहे. अजब प्रकाशनाने आता पुस्तके सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणली आणि समाजातील सर्व घटकांना ग्रंथप्रेमी करण्यात मोलाचे योगदान दिले आणि देत आहे.
श्री मुश्रीफ पुढे म्हणाले, श्रीपाद ऑफसेटचे मालक व उद्योजक आर. डी. पाटील -देवाळेकर यांनीही पुस्तक छपाईच्या माध्यमातून ज्ञान, शिक्षण आणि प्रबोधाबरोबरच समाजसेवेचा मोठा वाटा उचललेला आहे.यावेळी अजब प्रकाशनाचे शितल मेहता, श्रीपाद ऑफसेटचे आर. डी. पाटील – देवाळेकर,
कुणाल पाटील (सनी), विशाल कुमठेकर, मनोज साळुंखे आदी प्रमुख उपस्थित होते.
Leave a Reply