
कोल्हापूर :कोरोना संसर्गाचे उपचार घेणार्यांसाठी आणि संस्थात्मक विलगीकरण केलेल्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कडून पुस्तके भेट देण्यात आली . राजश्री छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. श्रीमती मीनाक्षी गजभिये यांच्याकडे सुपूर्द केली . या ग्रंथ संपत्तीमध्ये पाचशेहून अधिक पुस्तकांचा समावेश आहे. या पुस्तकांमध्ये राजा शिवछत्रपती, हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची निवडक भाषणे, महात्मा गांधी विचार संग्रह , श्यामची आई, संपूर्ण चाणक्य नीति, रावणायन, एपीजे अब्दुल कलाम , बराक ओबामा , दुर्योधन चरित्र, आजीबाईचा बटवा, संत तुकारामाची गाथा, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, योगाभ्यास, विचारांचे सोनं, भारतीय उद्योजिका, मॅक्झिम गॉर्की, मदर तेरेसा, शिवसेना:50 वर्षांची घोडदौड, 1857 चे स्वातंत्र्यसमर, राजयोग, महान सम्राट अशोक, शेत-शिवार, शून्य ते शिखर अशा महत्त्वाच्या पुस्तकांचा समावेश आहे.यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, कोल्हापुरातील अजब प्रकाशन संस्था ही मराठी साहित्य विश्वातील एक नावाजलेली प्रकाशन संस्था आहे. सामाजिक बांधिलकीतून जपलेले अजब प्रकाशनचे साहित्य दातृत्व कौतुकास्पद आहे. त्यांच्या या प्रयत्नातून कोरोनाशी लढणार्यांच्या जीवनातील अस्वस्थता जाऊन त्यांच्या जीवनात प्रकाश पडणार आहे.
Leave a Reply